ज्येष्ठ क्रीडा पत्रकार शशिकांत भागवत यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

पुणे - ‘सकाळ’चे माजी सहसंपादक व पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शशिकांत भागवत (वय ६१) यांचे हृदयविकाराने आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

पुणे - ‘सकाळ’चे माजी सहसंपादक व पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शशिकांत भागवत (वय ६१) यांचे हृदयविकाराने आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

भागवत यांनी विद्यार्थी बातमीदार म्हणून ‘सकाळ’मध्ये कामाला सुरवात केली आणि त्यानंतर विविध विभागांतील कामे आत्मसात केली. त्यानंतर क्रीडा पत्रकार म्हणून कारकीर्द घडविताना विविध घडामोडींवर सातत्याने लेखन केले. ‘सकाळ’मध्ये क्रीडा विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी अनेक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वार्तांकन केले. ‘माध्यम रत्न पुरस्कार’, ‘प्रबोधन क्रीडा पुरस्कार’ आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविले होते. दोन वर्षांपूर्वी ते ‘सकाळ’मधून निवृत्त झाले. 

Web Title: sports news Senior Sports journalist Shashikant Bhagwat passes away