विश्‍वकरंडक नेमबाजीत अमेरिका, चीनपेक्षा भारत प्रथमच सरस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

मुंबई - विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी भारतीय नेमबाजांनी केली. यापूर्वी भारताने २००९ च्या चार स्पर्धांत मिळून सात पदके जिंकली होती, हीच सर्वोत्तम कामगिरी होती. भारताने यंदाच्या पहिल्याच स्पर्धेत चार सुवर्णपदकांसह नऊ पदके जिंकण्याचा पराक्रम केला. पदकांमध्ये भारताने अमेरिका, चीनपेक्षा सरस कामगिरी केली.

मेक्‍सिकोतील गुआलादाजारा येथे झालेल्या स्पर्धेत भारताने केवळ सर्वाधिक पदकेच नव्हे, तर सर्वाधिक सुवर्णपदकेही जिंकली. एकंदर १५ पैकी चार सुवर्णपदके भारताने पटकावली. तर अमेरिकेने तीन आणि चीनने दोन जिंकली. शाहजार रिझवी, मनू भाकर, अखिल शेरॉन, ओम प्रकाश मिथरवाल, अंजुम मौदगिल, मेहुली घोष या नवोदितांनी भारताची शान उंचावली, त्याचबरोबर जितू राय, रवी कुमारने प्रभावी कामगिरी केली, तर संजीव राजपूतचे पदक थोडक्‍यात हुकले. 

या स्पर्धेत ५० देशांतील ४०४ नेमबाजांचा सहभाग होता. एकंदर ५९४ प्रवेशिका स्पर्धेसाठी आल्या आणि त्यांच्यात १५  सुवर्णपदकांसाठी चुरस झाली आणि १५ देशांनी पदके जिंकली. भारत आणि चीन सोडल्यास आशियातील एकाही देशाने पदक जिंकले नाही. 

दरम्यान, स्पर्धेच्या सांगतादिनी भारतास स्कीटमध्ये पदक जिंकण्यात अपयश आले. पहिल्या दोन फेऱ्यानंतर स्मित सिंग सहावा होता, पण अखेर तो ११६ गुणांपर्यंतच जाऊ शकला आणि १५ वा आला. अंगद बाजवा (११५) १८ वा, तर शिराज शेख (११२) ३० वा आला.

Web Title: sports news shooting india china america