महाराष्ट्रातील शूटिंग रेंज थर्ड क्‍लास - अंजली भागवत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

मुंबई - आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय नेमबाज यशस्वी होत असले तरी, त्यात राज्याचे नेमबाज फारसे कुठेच दिसत नाहीत, याकडे लक्ष वेधल्यावर अंजलीने राज्यात सुविधा कुठे आहेत, प्रोत्साहन नाही, येथील रेंज थर्ड क्‍लासच आहेत, असे सांगितले.

महाराष्ट्रात खेळाडूंना आर्थिक प्रोत्साहन मिळत नाही. खेळासाठी सुविधाही नसतात. अन्य राज्यांतील नेमबाजांना सुविधा मिळत आहेत. महाराष्ट्रातील रेंज थर्ड क्‍लास आहेत. मुंबईतील रेंजवर चांगल्या सुविधा नाहीत. 

पुण्यातील शूटिंग रेंज आंतरराष्ट्रीय दर्जाची होती; पण तिची चांगली निगा राखलेली नाही. मी जर तिथे १०.९ गुणांचा वेध घेतल्याचे दाखवले, तर तो शॉट मी मारला आहे की मशिनने हेच मला कळत नाही, अशी खंत तिने व्यक्त केली.

राष्ट्रीय कुमार नेमबाजीत महाराष्ट्रातील स्पर्धकांची संख्या  सर्वांत जास्त आहे. काही नेमबाज चांगली कामगिरी करीत आहेत; पण त्याच वेळी आपण हरियानातील नेमबाजांनी गेल्या काही वर्षांत खूपच प्रगती केली आहे, तर कोणास अपेक्षा नसलेल्या गुजरातमधील नेमबाजही यशस्वी होत आहेत याकडे तिने लक्ष वेधले.

Web Title: sports news Shooting range of Maharashtra Third Class Anjali Bhagwat