विक्रम काकडेला ट्रॅपमध्ये रौप्य, तर डबल ट्रॅपला ब्राँझ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

पुणे - राज्य शॉटगन अजिंक्‍यपद नेमबाजी स्पर्धेत पुण्याच्या विक्रम काकडे याने ट्रॅपमध्ये रौप्य, तर डबल ट्रॅप प्रकारात ब्राँझपदकाची कामगिरी केली. या कामगिरीसह तो १० ते १८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय शॉटगन अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. 

महाराष्ट्र रायफल असोसिएशनतर्फे म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलातील रेंजमध्ये आयोजित शॉटगन स्पर्धेत ट्रॅप प्रखारात प्रणव गुप्ता याने १०६ गुणांसह सुवर्णपदकाचा मान मिळविला. विक्रम काकडे १०० गुणांसह रौप्य, तर सिद्धार्थ पवार ९९ गुणांसह ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. डबल ट्रॅपमध्ये विक्रम आणि विजय जाधवर यांचे समान गुण झाले होते. त्यामुळे त्यांच्यात ब्राँझपदकासाठी झालेल्या शूटआऊटमध्ये विक्रमने बाजी मारली. या प्रकारात सिद्धार्थ पवार (११३) सुवर्ण, तर प्रणव गुप्ता (१०८) रौप्यपदकाचा मानकरी ठरला. तीन वर्षे सरावापासून दूर राहिल्यानंतरही राज्य स्पर्धेत दोन पदकाला गवसणी घातल्याने विक्रम समाधनी होता. आता अधिक चांगला सराव करून राष्ट्रीय स्पर्धेत छाप पाडायची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.

Web Title: sports news shotgun shooting competition