सिमरनची राष्ट्रीय विजेतेपदाची हॅटट्रिक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

पुणे - मुलींच्या २०व्या सब-ज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हरियानाच्या मुलींनी निर्विवाद वर्चस्व राखले. पण, यातही सिमरन ही एक मुलगी अशी होती की तिने त्यांना सर्वच्या सर्व दहा सुवर्णपदके मिळवू दिली नाहीत. हरियानाच्या मुलींनी दहापैकी ९ वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. मात्र, ४३ किलो वजनी गटात सिमरनने त्यांचे पदक हिरावून घेतले. एकदा नव्हे, तर सलग तिसऱ्यांदा सिमरनने सब-ज्युनियर गटात सुवर्णपदकाची कमाई करून शानदार हॅटट्रिक साधली.

सिमरनने हरियानाच्या हनीकुमारी हिला तांत्रिक गुणांवर अवघ्या दोन मिनिटांच्या आत हरवले. सिमरनच्या खेळातील सफाई, तिचा चपळपणा आणि निर्णय क्षमता जबरदस्त होती. मॅट वरच्या गुणांच्या कुस्तीत काहिसा हक्काचा असणारा कलाजंग डाव तिचे वैशिष्ट्य आहे. पण, या डावाबरोबरच मोडा आणि झोल याचाही सुरेख वापर करून सिमरनने वयाच्या सतराव्या वर्षीच आपण पारंगत असल्याचे दाखवून दिले. पहिले मार्गदर्शक आणि वडील राजेश यांच्याबरोबर येथे आलेली सिमरन मुझे तो शायद आदतसी पड गयी है (मला आता सुवर्णपदकाची सवय झाली आहे.) असे म्हणतच बोलायला सुरवात केली. 

लहानपणी कुस्ती खेळण्याची इच्छा व्यक्त केल्यावर मला घरून प्रोत्साहनच मिळाले. तेजसिंग आखाड्यात वडील राजेश यांच्याकडेच धडे गिरवायला सुरवात केल्यावर एकता रिकी सुहाग यांच्याकडूनही मार्गदर्शन घेत आहे. आता कठोर मेहनत घेऊन देशासाठी ऑलिंपिक सुवर्णपदक मिळविण्याचे उद्दिष्ट आहे.
- सिमरन

Web Title: sports news simran pune wrestling