‘रुपेरी सिंधू’ ध्वजधारक

वृत्तसंस्था
रविवार, 25 मार्च 2018

नवी दिल्ली - आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी उद्‌घाटन सोहळ्यात भारतीय पथकाची ध्वजधारक हा बहुमान अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिला देण्यात आला आहे. वरिष्ठ देशभगिनी साईना नेहवाल आणि प्रसिद्ध बॉक्‍सर मेरी कोम यांच्याऐवजी सिंधूची निवड झाली.

या दोघींना अशा स्पर्धांत हा मान अद्याप मिळालेला नाही. रिओ ऑलिंपिकमधील रुपेरी यशामुळे, तसेच अलीकडच्या काळातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे सिंधूला पसंती मिळाली. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये चार एप्रिलपासून सुरू होत आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) साईना व मेरी यांच्या नावांचासुद्धा विचार केला. 

Web Title: sports news sindhu Commonwealth Games