सौम्यजितबाबत संदिग्धता

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

एका वर्षापासून ती मला ब्लॅकमेल करीत आहे. आतापर्यंत तिला एक लाखाहून अधिक रक्कम दिली आहे. तिच्याबरोबर लग्नही करण्याची तयारी दाखवली होती. तिच्या ब्लॅकमेलिंगने मी त्रासलो आहे. 
- सौम्यजित घोष

मुंबई/नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय टेबल टेनिस संघात निवडलेल्या सौम्यजित घोष याच्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. लग्नाच्या भूलथापा देऊन आपल्याला फसविल्याचा आरोप १८ वर्षीय मुलीने सौम्यजितवर केला आहे. 

कोलकात्यातील बारासात महिला पोलिस ठाण्यात सौम्यजितविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत त्या मुलीने सौम्यजितने आपणास गर्भपात करण्यास भाग पाडले, असेही म्हटले आहे. त्याचबरोबर उत्तर बंगालमधील एका देवळात आपले लग्न झाल्याचाही दावा केला आहे. ‘आम्हाला वर्तमानपत्रातील बातमी वाचूनच सौम्यजितवरील आरोपाची माहिती समजली. त्याच्यावरील आरोप गंभीर आहेत. यासंदर्भात भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या कार्यकारिणीची रविवारी तातडीची सभा होईल,’ असे भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सचिव एम. पी. सिंग यांनी सांगितले.  

Web Title: sports news Soumyajit Ghosh