क्रीडा प्रायोजकांमध्ये १४ टक्‍क्‍यांनी वाढ

क्रीडा प्रायोजकांमध्ये १४ टक्‍क्‍यांनी वाढ

मुंबई - नोटाबंदी आणि जीएसटीचा अनेक उद्योगांना तसेच कार्यक्रमांना फटका बसत असतानाच गतवर्षी भारतीय क्रीडा क्षेत्राचा पुरस्कार तब्बल १४ टक्‍क्‍यांनी वाढला त्यातही प्रत्यक्ष मैदानावरील पुरस्कर्त्यात वाढ झाली त्याचबरोबर क्रीडा पुरस्कारांची एकंदर रक्कम प्रथमच एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाली. 

ईएसपी प्रॉपर्टीजने तयार केलेल्या अहवालानुसार प्रत्यक्ष मैदानावरील पुरस्कृत रक्कम ६ हजार ४०० कोटींवरून ७ हजार ३०० कोटीपर्यंत वाढली. एवढेच नव्हे, तर गतवर्षात जाहिरातींवर ६१ हजार २६३ कोटी खर्च झाले त्यातील १२ टक्के क्रीडाबाबत होते.

 क्रिकेटव्यतिरीक्त  खेळांच्या पुरस्कर्त्यात  मोठी वाढ
विश्वकरंडक सतरा वर्षांखालील स्पर्धा आयोजनाचा फुटबॉलला फायदा, एकंदरीत ६४ टक्के वाढ
आयएसएल पुरस्कर्त्यात २२ टक्के वाढ
आयपीएल तसेच प्रो कबड्डीच्या टीव्ही रेटिंगमधील तफावत खूपच कमी
प्रो कबड्डीचे टीव्ही रेटिंग १.५, तर आयपीएलचे २.७
प्रो कबड्डीचा प्रतिसाद ३१ कोटी २० लाख चाहत्यांचा तर आयपीएलचा ४१ कोटी १० लाख. 
टेबल टेनिस, क्‍यू स्लॅम, एसबीएल, एसएफएल, पी वन पॉवर बोटिंग यासारख्या लीगमुळे फ्रॅंचाईज वाढ
गतवर्षात नव्याने ३६ फ्रॅंचाईज विविध खेळात
सर्वच खेळांच्या लीगच्या पुरस्कार रकमेत वाढ
आयपीएल, प्रो कबड्डी लीग, आयएसएल तसेच 
प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या सोशल मीडियावरील प्रतिसादात जवळपास वीस पटीने वाढ

भारतीय खेळाडूत विराट कोहली हा सर्वात लोकप्रिय आहे. तो १९ ब्रॅंड एंडॉर्स करतो आणि त्याची एकंदरीत किंमत दीडशे कोटी रुपयांहून जास्त आहे, तर बिगर क्रिकेटपटूत सिंधू अव्वल आहे, अकरा ब्रॅंड्‌स असलेल्या सिंधूचे यापासूनचे उत्पन्न तीस कोटींपेक्षा जास्त आहे.
- विनीत कर्णिक, बिझनेस हेड ईएसपी प्रॉपर्टीज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com