महासंघातील ढिसाळपणाला माफी नाही - राठोड

पीटीआय
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा महासंघांना सज्जड दम देताना यापुढे महासंघाच्या कामकाजातील ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात बजावले. 

नवी दिल्ली - केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा महासंघांना सज्जड दम देताना यापुढे महासंघाच्या कामकाजातील ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात बजावले. 

क्रीडामंत्री राठोड यांच्या हस्ते मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा कार्यशाळेचे उद्‌घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘देशातील ६५ टक्के जनता ही ३५ वर्षांखालील आहे. त्यामुळेच देशात क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘खेलो इंडिया’ योजनेला सुरवात केली आहे. यासाठीच यापुढे कुठल्याही क्रीडा महासंघातील ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक महासंघाच्या संघ निवड प्रक्रियेबरोबरच सर्व कामांत पारदर्शीपणा अपेक्षित आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यपद्धतीचे आता आवलोकन करण्यात येणार आहे.’’

देशातील क्रीडा विकास साधताना आता यापुढे सर्व क्रीडा महासंघांनी व्यावसायिकता राखणे गरजेचे आहे. राठोड म्हणाले, ‘‘क्रीडा मंत्रालय आता धोरण ठरवणार असून, त्याच्या अंमलबाजवणीची जबाबदारी स्वतंत्र व्यक्तीकडे सोपविण्यात येणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा आमचा विचार आहे.’’

केंद्रीय क्रीडामंत्री बनलेले राठोड हे पहिले खेळाडू आहेत. देशातील एकूणच क्रीडा पद्धतीला साचेबद्धपणा येणे आवश्‍यक आहे, असे सांगून ते म्हणाले, ‘‘एकूणच क्रीडा क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलण्याची गरज आहे. देशात कमी पैशात खेळण्याची मैदाने उपलब्ध झाली पाहिजेत. जेव्हा केव्हा देशात मैदान उभारण्याचा विचार होईल तेव्हा त्याने ऑलिंपिक मैदानासारखेच मैदान उभारण्याचा विचार करायला हवा. त्याचबरोबर आपल्याकडील प्रशिक्षकही सुशिक्षित असायला हवा. आतापासून आम्ही दरवर्षी प्रशिक्षकाच्याही कामगिरीचे आवलोकन करणार आहोत.’’

Web Title: sports news Sports Minister Rajyavardhan Singh Rathore