झिंबाब्वेचा आठ वर्षांत प्रथमच परदेशात विजय

पीटीआय
मंगळवार, 11 जुलै 2017

हंबनतोता - आपल्याच क्रीडामंत्र्याकडून ढेरपोटे, तसेच अनफिट हिणवले गेलेल्या श्रीलंकेस झिंबाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हार पत्करावी लागली. जागतिक क्रमवारीत अकरावे असलेल्या झिंबाब्वेने आठ वर्षांत परदेशात प्रथमच मालिका जिंकली.

हंबनतोता - आपल्याच क्रीडामंत्र्याकडून ढेरपोटे, तसेच अनफिट हिणवले गेलेल्या श्रीलंकेस झिंबाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हार पत्करावी लागली. जागतिक क्रमवारीत अकरावे असलेल्या झिंबाब्वेने आठ वर्षांत परदेशात प्रथमच मालिका जिंकली.

चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका साखळीतच गारद झाल्यावर सरकारने सर्व क्रिकेटपटूंची तंदुरुस्त चाचणी घेतली होती. त्या अहवालानंतर संघातील एकही खेळाडू फीट नाही, असे श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासिरी जयसेकरा यांनी सांगितले होते. एवढेच नव्हे, तर क्रिकेटपटूंचे बॉडी फॅट सरासरी १६ टक्के असते. श्रीलंका क्रिकेटपटूत हेच प्रमाण २६ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्या वेळी त्यांनी खेळाडूंना तंदुरुस्त होण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. आता या पराभवानंतरची त्यांची टिप्पणी महत्त्वाची असेल.

झिंबाब्वेची फिरकी श्रीलंकेची डोकेदुखी ठरली. झिंबाब्वेचा ऑफ स्पिनर सिकंदर रझा याने २१ धावांत तीन विकेट्‌स घेत श्रीलंकेला ८ बाद २०३ असे रोखले. झिंबाब्वेने तीन विकेट्‌स आणि ७१ चेंडू राखत विजयी लक्ष्य गाठले. 

झिंबाब्वेचा डाव एक बाद १३७ वरून सात बाद १७५ असा घसरला होता, पण रझा (२७) आणि कर्णधार ग्रॅमी क्रेमर (११) यांनी २९ धावांची नाबाद भागीदारी करीत ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

ऐतिहासिक विजय
२००९ नंतर झिंबाब्वेचा परदेशात विजय, त्या वेळी केनिया ५-० सरशी. त्यानंतरच्या बारा मालिकांत पराभव. त्यात अफगाणिस्तान तसेच आयर्लंडविरुद्धही हार
२००१ नंतर प्रथमच कसोटी दर्जा असलेल्या संघाविरुद्ध मालिका विजय. त्या वेळी मायदेशात बांगलादेशविरुद्ध विजय.
कसोटी दर्जा असलेल्या संघांविरुद्धच्या २९ मालिकांपैकी तिसरा विजय. 
सरत्या मालिकेत झिंबाब्वेचा स्ट्राईक रेट ९६.१६ तर श्रीलंकेचा ८८.१४. झिंबाब्वेची चौकारातही (१४३-१२८) हुकूमत
श्रीलंका मायदेशातील सलग तिसऱ्या मालिकेत विजयाविना. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध हार, तर बांगलादेशविरुद्ध बरोबरी.
या मालिकेत धावांचा पाठलाग करताना तीन लढतीत विजय.

Web Title: sports news Sri Lanka vs Zimbabwe