‘स्टोलनवेल्थ गेम्स’मध्ये रोजच व्यत्यय आणणार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

गोल्ड कोस्ट - आपली हिसकावून घेतलेली जमीन परत देण्यात यावी, आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करणाऱ्या मूळनिवासांच्या गटाने कॉमनवेल्थ गेम्सला ‘स्टोलनवेल्थ गेम्स’ म्हणत आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी क्वीन्स बॅटन आणण्याचा मार्गही रोखला. त्याचबरोबर स्पर्धा सुरू असताना मार्गावर आंदोलन करून स्पर्धेत व्यत्यय आणण्याचेही ठरवले आहे. निदर्शकांनी केवळ बॅटन रिलेचा मार्गच रोखला नाही, तर राष्ट्रकुल स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा झालेल्या स्टेडियमकडेही मोर्चा वळवला होता; पण पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वाराजवळ रोखले. या वेळी निदर्शक आणि पोलिसांत माफक चकमकही झाली. 

इंग्लंड आफ्रिका खंडात
इंग्लंड माहीत आहे. आफ्रिका देशातील छोटासा देश, लोकसंख्या अंदाजे २० लाख, राजधानी बांजुल, तापमान क्वचितच ३० अंशांपेक्षा कमी असते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजक विक्री करीत असलेल्या माहितीपुस्तकात हीच ओळख आहे. ही ओळख खरी आहे ती गांबिया या सेनेगलच्या कुशीत असलेल्या पश्‍चिम आफ्रिकन देशाची. या देशाने एका महिन्यापूर्वी पुन्हा राष्ट्रकुलात सहभागी होण्याचे ठरवले आहे; पण त्याचे नामकरण संयोजकांनी इंग्लंड केले.

Web Title: sports news stolan wealth games common wealth games