एएफसी मासिकाच्या कव्हरवर छेत्रीची छबी

पीटीआय
बुधवार, 12 जुलै 2017

मुंबई - विश्वकरंडक सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा तीन महिन्यांवर असतानाच भारताच्या वरिष्ठ संघाचा कर्णधार सुनील छेत्री हा आशियाई फुटबॉल महासंघाच्या त्रैमासिकावर झळकला आहे. हा मान मिळणारा तो भारताचा पहिलाच फुटबॉलपटू आहे. आशियाई फुटबॉल महासंघातर्फे प्रकाशित होत असलेल्या या त्रैमासिकात स्टार खेळाडू, मार्गदर्शक, क्‍लब तसेच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती प्रसिद्ध होत असतात. आशियाई फुटबॉलमध्ये त्यास खूपच महत्त्व आहे. या त्रैमासिकाच्या १९ व्या अंकाच्या मुखपृष्ठावर छेत्रीचे छायाचित्र झळकले आहे. 

छेत्री हा बंगळूर एफसीचा प्रमुख खेळाडू आहे. पुढील महिन्यात बंगळूर एफसीचे होम ग्राऊंड असलेल्या श्री कंटिरवा स्टेडियमवर एएफसी कपमधील लढत होईल. आशियाई पात्रता स्पर्धेत भारताच्या मकावविरुद्ध सप्टेंबर तसेच ऑक्‍टोबरमध्ये लढती होतील, त्या लढतीपूर्वी त्याला हा सन्मान लाभला आहे. 

छेत्रीवरील लेखात त्याचे बालपण, त्याला लहानपणासून असलेली फुटबॉलची आवड, यावर भर आहे. छेत्रीचे वडील लष्कर फुटबॉल संघात होते, तर त्याची आई नेपाळकडून फुटबॉल खेळली आहे. त्याने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय गोल पाकिस्तानविरुद्ध २००५ मध्ये केला होता. छेत्रीने मुलाखतीत आपण फुटबॉलमध्ये एवढी प्रगती करू, असे कधीही वाटले नव्हते, असे छेत्रीने मुलाखतीत सांगितले.

Web Title: sports news Sunil Chhetri