मार्गदर्शकांच्या कबुलीने अडचण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नवी दिल्ली/गोल्ड कोस्ट - रस्त्यावर पडलेल्या बाटलीत सिरींज असल्याने आम्ही ती वैद्यकीय समितीकडे सुपूर्त केली होती, असा दावा भारतीय बॉक्‍सिंग संघाचे व्यवस्थापक अजय नारंग यांनी केल्यानंतर काही तासांतच मार्गदर्शक सॅंतिएगो निएवा यांनी आम्ही एका बॉक्‍सरला व्हिटॅमिनचे इंजेक्‍शन दिल्याचे मान्य केले आहे. 

भारतीय पदाधिकारी सूया सापडल्यापासून त्यांचा वापर आम्ही केलेला नाही. त्या आमच्या रूममध्ये आढळल्याच नव्हत्या. त्या परिसरात आढळल्याने भारतीयांवर संशय घेणे चुकीचे आहे, असे सांगितले जात होते; मात्र भारतीय बॉक्‍सिंग मार्गदर्शक निएवा यांनी ऑस्ट्रेलियातील सेवन नेटवर्क वाहिनीस दिलेल्या मुलाखतीत एका बॉक्‍सरला इंजेक्‍शन दिल्याचे मान्य केले. आमचा एक बॉक्‍सर आजारी पडला. त्याला इंजेक्‍शन देण्यात आले. आम्ही कोणतेही बंदी घातलेल्या गोष्टीचे सेवन केलेले नाही. आजारी असल्यानेच त्या बॉक्‍सरला व्हिटॅमिन देण्यात आले होते, असे निएवा यांनी मुलाखतीत सांगितल्याचे वृत्त आहे. त्यांनी संघातील सर्व १२ बॉक्‍सरची उत्तेजक चाचणी झाल्याचेही सांगितले. त्याचबरोबर आता आम्हाला नो नीडल नियम किती कठोर आहे, हेही समजले असल्याचे सांगितले.

Web Title: sports news syringe boxing team