अँडी मरे, वॉव्रींकाचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

पीटीआय
शुक्रवार, 2 जून 2017

पॅरिस - अँडी मरे आणि नोव्हाक जोकोविच यांनी फ्रेच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत तिसरी फेरी गाठली.

मरेने बिगरमानांकित स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्‍लिझॅनचे आव्हान ६-७ (३-७), ६-२, ६-२, ७-६ (७-३) असे परतावून लावले. ५०व्या स्थानावरील प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मरेला तीन तास ३४ मिनिटे झुंज द्यावी लागली. वॉव्रींकाने युक्रेनच्या अलेक्‍झांडर डोल्गोपोलोव याला ६-४, ७-६ (७-५), ७-५ असे हरविले.

ॲग्नीस्का रॅडवन्स्काला बेल्जियमच्या ॲलिसन वॅन उत्वांकने झुंजविले. नववे मानांकन असलेल्या ॲग्नीस्काला तमाम अनुभव पणास लावत संघर्ष करावा लागला. अखेरीस तिने ६-७ (३-७), ६-२, ६-३ असा विजय मिळविला. ॲलिसन जागतिक क्रमवारीत ११३व्या स्थानावर आहे. पहिल्या सेटमध्ये तिने ३-१ अशी आघाडी घेतली. पहिला सेट गमावल्यामुळे ॲग्नीस्कावर दडपण आले होते. अशा वेळी तिने खेळात वैविध्य आणले. नेटजवळ धाव घेत तिने ॲलिसनच्या सर्व्हिसवर आक्रमण केले. यंदाच्या मोसमात एकेरीतील सर्वोत्तम टेनिसपटू मानल्या जाणाऱ्या स्विटोलिना हिला बल्गेरियाच्या स्वेटाना पिरोन्कोवा हिने झुंजवले. तीन सेटपर्यंत रंगलेली लढत स्विटोलिनाने ३-६, ६-३, ६-२ अशी जिंकली. 

पेस, दिवीज-पुरव विजयी
लिअँडर पेसने अमेरिकेच्या स्कॉट लिप्स्की याच्या साथीत विजयी सलामी दिली. या जोडीने राडू अल्बोट (मोल्डोवा)-हिऑन चुंग (कोरिया) यांचे आव्हान ७-६ (७-५), ४-६, ६-२ असे परतावून लावले. दिवीज शरण-पुरव राजा यांनीही आगेकूच केली. त्यांनी निकोलस अल्माग्रो (स्पेन)-स्टीव जॉन्सन (अमेरिका) यांना ६-७ (५-७), ६-४, ६-० असे हरविले.

Web Title: sports news tennis Andy Murray and Novak Djokovic