टेनिसपटू युकीने गाठला ‘माइलस्टोन’

पीटीआय
रविवार, 11 मार्च 2018

इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - भारताचा एकेरीतील आघाडीचा टेनिसपटू युकी भांब्री याने कारकिर्दीतील ‘माइलस्टोन’ विजय नोंदविला. त्याने इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने फ्रान्सच्या निकोलस माहुतला दोन सेटमध्ये हरविले. ‘मास्टर्स १०००’ मालिकेतील स्पर्धेत कारकिर्दीत दुसऱ्यांदाच सहभागी होताना युकीने मुख्य ड्रॉमध्ये पहिलावहिला विजय नोंदविला.

इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - भारताचा एकेरीतील आघाडीचा टेनिसपटू युकी भांब्री याने कारकिर्दीतील ‘माइलस्टोन’ विजय नोंदविला. त्याने इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने फ्रान्सच्या निकोलस माहुतला दोन सेटमध्ये हरविले. ‘मास्टर्स १०००’ मालिकेतील स्पर्धेत कारकिर्दीत दुसऱ्यांदाच सहभागी होताना युकीने मुख्य ड्रॉमध्ये पहिलावहिला विजय नोंदविला.

जागतिक क्रमवारीत युकी ११०व्या, तर निकोलस १०१व्या क्रमांकावर आहे. या दोघांत प्रथमच लढत झाली. निकोलस हा अनुभवी खेळाडू आहे. विंबल्डनमध्ये चौथी, तर इतर तीन ग्रॅंड स्लॅम स्पर्धांत त्याने तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली आहे. २०१४ मध्ये तो ३७व्या क्रमांकापर्यंत पोचला होता. युकीने पहिल्या सेटमध्ये १-४, तर दुसऱ्या सेटमध्ये १-३ अशी पिछाडी भरून काढताना विजीगिषूवृत्ती प्रदर्शित केली.

असा झाला सामना
पहिल्या सेटमध्ये निकोलसने पहिला ब्रेक मिळविला. त्याने दुसऱ्या गेममध्ये युकीची सर्व्हिस भेदत ३-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर लवकरच तो ४-१ असा पुढे होता. त्यानंतर युकीने खेळ उंचावला. दुसरीकडे निकोलसकडून फोरहॅंडचे फटके चुकू लागले. सातव्या गेममधील ब्रेकनंतर युकीने सर्व्हिस राखत ४-४ अशी बरोबरी साधली. मग नवव्या गेममध्ये त्याने निकोलसची सर्व्हिस पुन्हा भेदली. मग सेट जिंकण्यासाठी सर्व्हिस राखण्याची गरज असताना त्याला ब्रेकला सामोरे जावे लागले. त्यामुळे ५-५ अशी बरोबरी झाली. यानंतरही युकीने हार मानली नाही. ११व्या गेममध्ये त्याने आणखी एक ब्रेक मिळविला. मग सर्व्हिस राखत त्याने आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटमध्ये युकीने निकोलसच्या सर्व्हिसवर आक्रमक फटके मारत दडपण आणले. यानंतरही निकोलसने पहिला ब्रेक मिळविला. चौथ्या गेममध्ये युकीची सर्व्हिस भेदत त्याने ३-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर युकीने पुन्हा प्रतिआक्रमण रचले. त्याने पाच, सात, नऊ अशा तीन गेममध्ये लागोपाठ ब्रेक मिळविले.

आता आव्हान पॉलीचे
युकीची यानंतर फ्रान्सच्याच ल्युकास पॉली याच्याशी लढत होईल. पॉलीला नववे मानांकन असून तो जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर आहे. युकी आणि पॉली यांच्यात दोन सामने झाले आहेत. २०१४ मध्ये दिल्लीत पॉली, तर चेन्नईत युकीचा विजय झाला होता. दोन्ही सामने तीन सेटपर्यंत रंगले होते.

  निकाल 
युकी भांब्री विवि 
निकोलस माहुत 
७-५, ६-३

युकी ‘टॉप हंड्रेड’मधील खेळाडू आहे. त्याच्याकडे दर्जा आहे. ऑस्ट्रेलियन ज्युनियर विजेता बनल्यानंतर त्याला दुर्दैवाने दुखापतींचा फटका बसला, पण गेल्या एक-दीड वर्षात त्याने तंदुरुस्ती आणि कामगिरी प्रयत्नपूर्वक सरावाने उंचावली आहे. इंडियन वेल्सला ‘फिफ्थ स्लॅम’ अर्थात पाचवी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा असे संबोधले जाते. ही एक प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. त्यात पात्रता फेरीतून आगेकूच केल्यानंतर अशी कामगिरी कौतुकास्पद आहे. निकोलस हा उत्तम खेळाडू आहे. युकीने फॉर्म कायम राखत आणखी एक-दोन फेऱ्या जिंकायला हव्यात. त्याला योग्य वेळी फॉर्म गवसला आहे. पुढील महिन्यात आपली डेव्हिस करंडक लढत आहे. युकीने दुखापती टाळून फॉर्म राखणे संघाच्या हिताचे ठरेल.
- गौरव नाटेकर,  अर्जुन पुरस्कार विजेते व डेव्हिस करंडक संघातील माजी खेळाडू

दृष्टिक्षेपात
 युकी कारकिर्दीत चौथ्यांदा मास्टर्स १००० मालिकेतील स्पर्धेत सहभागी
 २००९च्या मायामीतील स्पर्धेत वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश.
 पहिल्या फेरीत अर्जेंटिनाच्या दिएगो जुंक्‍युएरा याच्याविरुद्ध दोन सेटमध्ये पराभूत
 तेव्हा युकी ११४७व्या, तर दिएगो ७३व्या क्रमांकावर
 २०१० मध्ये मायामीतील स्पर्धेच्या पात्रता फेरीत पहिल्या सामन्यात डेनिस इस्तोमीन याच्याकडून दोन सेटमध्ये पराभूत
 तेव्हा युकी ३२६व्या, तर डेनिस ७७व्या क्रमांकावर
 २०१३ मध्ये मायामीच्या पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात एदुआर्द रॉजर-वॅसेलीन याच्याकडून दोन सेटमध्ये हार
 तेव्हा युकी २७२ वा, तर एदुआर्द ८०वा

Web Title: sports news tennis Yuki Bhambri

टॅग्स