टेनिसपटू युकी सलग दुसऱ्या ‘मास्टर्स’ला पात्र

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

मयामी - भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू युकी भांब्री कारकिर्दीत सलग दुसऱ्या एटीपी मास्टर्स १००० स्पर्धेच्या मुख्य ड्रॉसाठी पात्र ठरला. त्याने मयामी ओपनच्या पात्रता फेरीतील दुसऱ्या सामन्यात स्वीडनच्या एलियास येमर याला ७-५, ६-२ असे दोन सेटमध्येच हरविले.

युकी दोन आठवड्यांपूर्वी इंडियन वेल्समधील स्पर्धेला पात्र ठरला होता. त्याने तिसऱ्या फेरीपर्यंत वाटचाल केली होती. जागतिक क्रमवारीत युकी १०७, तर येमर १३३व्या क्रमांकावर आहे. 

पात्रता फेरीत युकीला नववे मानांकन होते. पहिले दहा गेम दोघांनी सर्व्हिस राखल्या. युकीने १७व्या मानांकित येमरची सर्व्हिस महत्त्वाच्या ११व्या गेममध्ये भेदली. त्यानंतर त्याने सर्व्हिस राखली. 

या सेटमध्ये त्याने ‘फर्स्ट सर्व्ह’वर ७० टक्के गुण जिंकले. दुसऱ्या सेटमध्ये युकीने दोन ब्रेक मिळवीत ५-१ अशी भक्कम आघाडी घेतली. 

येमरने दोन मॅचपॉइंट वाचविले, पण तो युकीला रोखू शकला नाही. युकीने एक तास २८ मिनिटांत सामना जिंकला.

दृष्टिक्षेपात
 पहिल्या फेरीत बोस्निया हर्जेगोविनाच्या मिर्झा बॅसिचचे आव्हान
 बॅसिच ७५व्या क्रमांकावर
 दुसऱ्या पात्रता सामन्यात पराभूत; पण अर्जेंटिनाच्या फेडेरिको  डेल्बोनीसच्या माघारीमुळे ‘लकी लुझर’ म्हणून प्रवेश
 २०१६च्या सोफिया ओपन एटीपी स्पर्धेत युकी त्याच्याकडून ३-६, ६-७ (४-७) असा पराभूत

Web Title: sports news tennis Yuki Bhambri india