क्रीडा प्रगतीत ढिसाळ प्रशासनाचा अडथळा

पीटीआय
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली -  आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धातील भारतीय क्रीडापटूंची कामगिरी खराब आहे. त्यास खेळातील ढिसाळ प्रशासन, व्यावसायिकतेचा अभाव तसेच चांगल्या देशांतर्गत स्पर्धा नसल्यामुळे हे घडत असल्याची कबुलीही संसदेत सरकारने दिली.

संसदेत खेळाच्या प्रश्नावरील चर्चेस केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल उपस्थित नव्हते. त्यांच्याऐवजी किरेन रिजिजू यांनी लोकसभेत ही जबाबदारी पार पाडली. भारतीय क्रीडापटूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी आपल्या क्षमतेइतकी होत नाही, असे त्यांनी सुरुवातीसच सांगितले. 

भारतात अनेक प्रश्न असल्यामुळे खेळात पिछेहाट होत असल्याचे त्यांनी सांगितले. व्यावसायिकतेचा अभाव असल्यामुळे ढिसाळ प्रशासन आहे. देशात चांगली स्पर्धाच नाही. स्पर्धेचा ढाचा नाही. गुणवत्तेचा शोध घेण्याची सक्षम यंत्रणा नाही तसेच क्रीडापटू घडविण्याची दिर्घकालीन योजनाही नसल्याचे त्यांनी सांगितले. 

खेळ आणि अभ्यासाची शालेय, महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ स्तरावर योग्य सांगड घातलेली नाही. उच्च स्तरावरील यशासाठी हवे असलेले मार्गदर्शन करु शकणारे पुरेसे मार्गदर्शक नाहीत. क्रीडा शास्त्र, विज्ञान, वैद्यक यासारख्या विषयात माहीती असणारे तज्ज्ञही नाहीत. या सर्व प्रश्नावर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत, असे रिजिजू यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी देशातील सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना चांगले प्रशासन आणण्याची सूचना केली आहे. 

केलेले उपाय
ॲथलेटिक्‍स, जलतरण, सायकलींग, रोईंग, बॉक्‍सिंग, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकीत राष्ट्रीय अकादमी. त्यात अत्याधुनिक सुविधा
खेलो इंडिया कार्यक्रमाद्वारे स्पर्धा वाढवण्याचा प्रयत्न
राष्ट्रीय शालेय, विद्यापीठ, महिला स्पर्धांबरोबरच ग्रामीण तसेच आदिवासी स्पर्धा
राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची लवकरच स्थापना होणार
क्रीडा प्राधीकरणाच्या मदतीने गुणवान क्रीडापटूंना मार्गदर्शन
८ ते २५ वयोगटातील गुणवान क्रीडापटूंचा सातत्याने शोध

Web Title: sports news Union Minister Kiran Rijiju sports