मिश्र रिले मिडलेत अमेरिकेचा विश्‍वविक्रम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

वैयक्तिक स्पर्धा प्रकारात ली किंग, कायली मॅस्सेची विक्रमी कामगिरी

बुडापेस्ट - अमेरिकेच्या मिश्र संघाने जागतिक जलतरण स्पर्धेत ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत विश्‍व विक्रमी वेळ नोंदवली. अमेरिकेच्या ली किंग हिने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक, कॅनडाच्या कायली मॅस्से हिने १०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत विश्‍वविक्रमी वेळ दिली.

अमेरिकेच्या रायन मरफी, केविन कॉर्डेस, केल्सेई वॉरेल, मॅलोरी कॉमेरफोर्ड यांनी ३ मिनिटे ४०.२८ सेकंद अशी वेळ दिली. यापूर्वी ३ मिनिटे ४१.७१ सेकंदाचा विक्रम ब्रिटनच्या नावावर होता. 

मिश्र रिले शर्यत जागतिक स्पर्धेत होण्याची ही केवळ दुसरीच स्पर्धा होती. अमेरिकेच्या संघाने पात्रता फेरीतच हा विक्रम केला. त्यामुळे आता होणाऱ्या अंतिम फेरीत हा विक्रम पुन्हा मोडला जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अमेरिकेसह ऑस्ट्रलिया, ब्रिटन आणि कॅनडा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या स्पर्धेतील हा सहा विश्‍व विक्रम ठरला. ब्रिटनच्या ॲडम पिटीने ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात अंतिम फेरीपूर्वी दोनदा विश्‍वविक्रमी वेळ दिली. त्यामुळे अंतिम फेरीत अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

अमेरिकेच्या लीग किंग हिने महिलांची १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यत विश्‍वविक्रमी वेळेसह जिंकली. ऑलिंपिक चॅंपियन लीली किंग हिने १ मिनिट ४.१३ सेकंद अशा वेळेसह चार वर्षांपूर्वीचा लिथुआनियाच्या रुता मेईलुटिटे हिचा विक्रम मोडीत काढला.

कॅनडाच्या कायली मॅस्से हिने १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात ५८.१० सेकंद अशा विश्‍व विक्रमी वेळेसह सुवर्णपदक पटकावले. अशी कामगिरी करणारी ती कॅनडाची पहिली महिला जलतरणपटू ठरली. यापूर्वीचा विक्रम ब्रिटनच्या गेम्मा स्पॉफॉर्थ (५८.१२ सेकंद) हिने २००९ मध्ये नोंदवला होता. ऑस्ट्रेलियाची एमिली सीबोम सुवर्णपदक राखण्यात अपयशी ठरली.

Web Title: sports news US record in mixed relay middle swimming competition