रेल्वेच्या महिलांनी जिंकली वसई-विरार मॅरेथॉन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

विरार - शर्यत सुरू होताना असलेला उकाडा आणि शर्यत संपताना असलेले धुके या संमिश्र वातावरणात रेल्वेच्या महिला धावपटूंच्या हुकमतीचे नेतृत्व गतविजेत्या स्वाती गाढवेने केले, तर पुरुषांच्या पूर्ण तसेच अर्धमॅरेथॉनमध्ये बीईजीचे स्पर्धक अव्वल ठरले.

विरार - शर्यत सुरू होताना असलेला उकाडा आणि शर्यत संपताना असलेले धुके या संमिश्र वातावरणात रेल्वेच्या महिला धावपटूंच्या हुकमतीचे नेतृत्व गतविजेत्या स्वाती गाढवेने केले, तर पुरुषांच्या पूर्ण तसेच अर्धमॅरेथॉनमध्ये बीईजीचे स्पर्धक अव्वल ठरले.

महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये मोनिकाने जरा जास्तच वेगवान सुरवात केली, त्यामुळे आघाडीच्या स्पर्धकांनी वेग घेतला; पण मोनिका हा वेग राखू शकली नाही. दहा किलोमीटरलाच स्वातीने आघाडी घेत आपणच या वेळी बाजी मारणार हे स्पष्ट केले. ‘‘स्टीपलचेसमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभागाची संधी मिळेल, तर मॅरेथॉन स्पर्धांतील यशामुळे घर सावरण्यास, स्टीपलचेसच्या पूर्वतयारीस बळ देण्यास मदत होते,’’ असे सांगतानाच स्वातीने पुढील वर्षी हॅट्ट्रिकसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
करण सिंगने स्पर्धात्मक मॅरेथॉनमध्ये पुनरागमन करताना बाजी मारली.

हॅमस्ट्रिंगमुळे ब्रेक घेणे भाग पडलेल्या करण सिंगने अखेरच्या एका किलोमीटरमध्ये वेग वाढवत मोहित राठोडला सहा सेकंदांनी मागे टाकले. या दोघांच्या स्पर्धेत गतविजेता राशपाल सिंग तिसरा आला. दिल्लीतील राष्ट्रीय मॅरेथॉन जिंकताना नोंदवलेल्या वेळेच्याही तो नजीक पोचला नाही. अंकित मलिकने अनुभवी प्रदीप सिंगला मागे टाकत पदार्पणात अर्धमॅरेथॉन जिंकली. पहिलीच स्पर्धा होती, त्यात जिंकलो, त्यामुळे खूश आहे. याबाबतचे सहकाऱ्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले, असे त्याने सांगितले.

मुख्य शर्यतीचे निकाल, पूर्ण मॅरेथॉन (४२ किमी पुरुष) : १) करण सिंग (बीईजी खडकी, २ तास २४.२६ सेकंद), २) मोहित राठोड (आर्टिलरी सेंटर हैदराबाद), ३) राशपाल सिंग (एएसआय पुणे). अर्धमॅरेथॉन (२१ किमी), पुरुष : १) अंकित मलिक (बीईजी, १ तास ५.५६ सेकंद), २) प्रदीप सिंग (एएसआय पुणे), शंकर मान थापा (एएसआय). महिला : १) स्वाती गाढवे (मध्य रेल्वे, १ तास १८.२६ सेकंद), २) चिंता यादव (रेल्वे), ३) मोनिका राऊत (दक्षिण पूर्व रेल्वे).

Web Title: sports news vasai-virar marathon win by railway women