चायनीज माल जादा टिकता नहीं - विजेंदर

पीटीआय
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - व्यावसायिक बॉक्‍सर विजेंदर सिंगने चीनच्या झुल्पीकार मैमैतियाली याच्याविरुद्धच्या लढतीचे रणशिंग खास त्याच्या शैलीत फुंकताना चायनीज माल जादा टिकता नहीं, असे सांगितले. विजेंदर आणि झुल्पीकार यांच्यात शनिवारी मुंबईत लढत होणार आहे. 

नवी दिल्ली - व्यावसायिक बॉक्‍सर विजेंदर सिंगने चीनच्या झुल्पीकार मैमैतियाली याच्याविरुद्धच्या लढतीचे रणशिंग खास त्याच्या शैलीत फुंकताना चायनीज माल जादा टिकता नहीं, असे सांगितले. विजेंदर आणि झुल्पीकार यांच्यात शनिवारी मुंबईत लढत होणार आहे. 

विजेंदर हा डब्लूबीओ आशिया पॅसिफिक मिडलवेट गटाचा विजेता आहे. त्याचा प्रतिस्पर्धी झुल्पीकार हा डब्लूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट गटात विजेता आहे. या दोघांतील लढत मुंबईच्या एनएससीआय येथे रंगणार आहे. बीजिंग ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या विजेंदरने या लढतीसाठी मॅंचेस्टर येथे सराव केला आहे. या लढतीत प्रतिस्पर्धी बॉक्‍सर आपले विजेतेपद पणास लावतील. विजेता बॉक्‍सर दोन्ही किताबांचा मानकरी होईल.

विजेंदर लढतीबाबत एका मिनिटात विजय मिळविण्याचे लक्ष्य बाळगून आहे. तो म्हणाला, या लढतीतील माझ्या विजयासाठी प्रार्थना करा, मी झटपट नॉकआउटसाठी प्रयत्न करणार आहे. ४५ सेकंदांतच झटपट लढत संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. चायनीजबाबत काहीच सांगता येत नाही. चायनीज माल जादा टिकता नहीं. 

विजेंदरचा प्रतिस्पर्धी त्याच्याहून नऊ वर्षे लहान आहे. विजेंदरला हरवण्यासाठी आपण दहा तास सराव करीत आहोत, असे त्याने सांगितले आहे. याकडे लक्ष वेधल्यावर विजेंदर म्हणाला, ‘‘व्यावसायिक लढतीत वय नव्हे अनुभव महत्त्वाचा असतो. तिशी पार केली असली तरी विशीतलाच असल्यासारखे वाटते. मला त्याच्याबाबत फार माहिती नाही. नेटवर शोधल्यानंतरही फारसे काही हाती लागले नाही. त्याच्याबाबत आता सर्व काही अभ्यास करण्यास प्रशिक्षकांना सांगितले आहे.’’  

Web Title: sports news Vijender singh