विराटकडून कुंबळेची बीसीसीआयकडे तक्रार?

पीटीआय
गुरुवार, 1 जून 2017

नवी दिल्ली - चॅंपियन्स स्पर्धेस सुरवात होत असताना भारतीय संघातील वादाविषयी जास्त चर्चा सुरू आहे. हा वाद प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. कुंबळे हे घमेंडखोर असल्याचा संदेश विराटने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना पाठवल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर हा वाद सोशल मीडियावर चर्चिला  जात आहे.

कुंबळे-विराट जोडीने टीम इंडियाला पुन्हा कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून दिले असले तरी अधूनमधून विराट हा कुंबळे यांच्याबाबत एखाद्या शब्दातून नाराजी व्यक्त करत होता. रवी शास्त्री प्रशिक्षक असताना जेवढा पाठिंबा मिळत होता तेवढा कुंबळे यांच्याकडून मिळत नसल्यामुळे दोघांच्या संबंधात ठिणगी पडल्याची चर्चा आहे.

पदाधिकारी लंडनला जाणार?
दरम्यान, समेट घडवण्यासाठी बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी आणि क्रिकेट व्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर गुरुवारी बर्मिंगहॅमला जाऊन या दोघांशी चर्चा करणार आहेत. तसेच येत्या रविवारी (ता. ४) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर प्रशिक्षकपदासाठी मुलाखतींनाही सुरवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय संघाच्या पुढील प्रशिक्षकपदासाठी कोणी कोणी अर्ज केले, याची माहिती बीसीसीआयकडून अद्याप उघड करण्यात आली नाही. 

Web Title: sports news virat kohli anil kumble