कोहली ‘सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू’

पीटीआय
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

दुबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची आयसीसीच्या वतीने दोन सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूबरोबर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ‘आयसीसी’ने त्याचा सन्मान केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.

दुबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची आयसीसीच्या वतीने दोन सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूबरोबर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ‘आयसीसी’ने त्याचा सन्मान केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.

या पुरस्कारासाठी २१ सप्टेंबर २०१६ ते डिसेंबर २१०७ या कालावधीतील खेळाडूंची कामगिरी ग्राह्य धरण्यात आली. सलग दुसऱ्या वर्षी एखादा भारतीय वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरला. गेल्यावर्षी अश्‍विनची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. कोहलीला याचबरोबर आयसीसीच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचे कर्णधार म्हणूनही निवडण्यात आले. 

कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीच्या बरोबरीने सातत्य राखणारा ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. स्मिथची दुसऱ्यांदा या पुरस्कारासाठी निवड झाली. यापूर्वी २०१५ मध्येदेखील त्याने हा पुरस्कार पटकावला होता. 

फिरकीचा सन्मान
भारताचा युजवेंद्र चहल आणि अफगाणिस्तानचा रशिद खान यांच्याही कामगिरीचा सन्मान आयसीसीने केला आहे. इंग्लंडविरुद्ध बंगळूर येथील सामन्यात २५ धावांत ६ गडी बाद करण्याची युजवेंद्रची कामगिरी टी-२० क्रिकेटमधील वर्षातील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. त्याचवेळी रशिद खानची सहयोगी सदस्य देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. त्याने गेल्या वर्षात कसोटीत ६०, तक एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४३ गडी बाद केले आहेत.

कसोटी संघ - डीन एल्गर, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, चेतेश्‍वर पुजारा, बेन स्टोक्‍स, क्विंटॉन डिकॉक (यष्टिरक्षक), आर. अश्‍विन, मिशेल स्टार्क, कागिसो रबाडा, जेम्स अँडरसन

एकदिवसीय - डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), बाबर आझम, एबी डिव्हिलर्स, क्विंटॉन डिकॉक (यष्टिरक्षक), बेन स्टोक्‍स, ट्रेंट बोल्ट, हसन अली, रशिद खान, जसप्रीत बुमरा.

असे आहेत पुरस्कार
सोबर्स ट्रॉफी (वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू) 
विराट कोहली

कोहली विशेष
 एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३२ शतके
 एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान ९ हजार धावा
 एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी कर्णधार
 एकदिवसीय सामन्यात आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर

क्रिकेट विश्‍वातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. सलग दुसऱ्या वर्षी या पुरस्कारासाठी भारतीय खेळाडूची निवड होणे अभिमानाची बाब आहे. कठोर मेहनतीने केलेल्या माझ्या कामगिरीची दखल घेतल्याबद्दल आयसीसीचे आभार आणि अन्य पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन.
- विराट कोहली, भारताचा कर्णधार

दुसऱ्यांदा या पुरस्कारासाठी निवड होणे हा मी सन्मानच मानतो. गेले वर्षभर माझ्या क्षमतेनुसार कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीचे कौतुक झाले. कामगिरीत सातत्य राखणे ही आता माझी जबाबदारी आहे.
- स्टीव्ह स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

कसोटी 
स्टीव्ह स्मिथ
एकदिवसीय 
विराट कोहली
लक्षवेधी खेळाडू
 हसन अली 
(पाकिस्तान)
सहयोगी सदस्य खेळाडू 
रशिद खान 
(अफगाणिस्तान)
टी-२० कामगिरी 
युजवेंद्र चहल
डेव्हिड शेफर्ड (ट्रॉफी) सर्वोत्कृष्ट पंच 
मरायस इरास्मस
स्पिरीट ऑफ क्रिकेट 
अन्या श्रुबसोल (इंग्लंड)

Web Title: sports news virat kohli cricket india icc