विश्‍वनाथन आनंद अखेर नववा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

मुंबई - विश्‍वनाथन आनंदला सेंट लुईस रॅपिड तसेच ब्लिटझ्‌ स्पर्धेत अखेर नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

या स्पर्धेतील ब्लिटझ्‌ प्रकारात आनंदची कामगिरी पाच बरोबरी, तीन पराभव आणि एक विजय अशी झाली. आनंदने स्पर्धेतील अखेरच्या दिवशी इयान नेपोमनियाची याला २९ चालीत हरवून छान सुरवात केली; मात्र त्यानंतर तो फॅबियानो करुना, हिकारू नाकामुरा, ले क्वांग लिएम यांच्याविरुद्ध पराजित झाला. लेवॉन ॲरॉनियन आणि गॅरी कास्पारोवविरुद्धच्या लढती बरोबरीत सोडवल्या तरीही तो नवव्या क्रमांकावर गेला. त्याचे एकंदर १४ गुण झाले, तर गॅरी कास्पारोवने आठवा क्रमांक मिळविताना १६ गुण मिळविले.

Web Title: sports news vishwanathan anand nine rank