निर्विवाद वर्चस्वासाठी भारत प्रयत्नशील

मुकुंद धस 
गुरुवार, 27 जुलै 2017

उपांत्यपूर्व फेरीत आज फिजीविरुद्ध लढत
बंगळूर - भारतीय महिला संघांनी सलग दोन विजय मिळवून सर्वांनाच अचंबित केले आहे. अशा वेळी आजच्या विश्रांतीनंतर उद्या गुरुवारी फिजीविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामनाही जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व राखण्यासाठी भारतीय महिला संघ प्रयत्नशील राहणार यात शंकाच नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाने तसे संकेतच दिले.

अनुभवी कर्णधार अनिता दुखापतग्रस्त होऊ नये म्हणून तिला थोडी थोडी विश्रांती देऊन खेळविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे इतर खेळाडूदेखील महत्त्वाच्या सामन्यांसाठी ताजेतवाने राहतील याची काळजी घेण्यात आली आहे. प्रत्येक खेळाडूला आवश्‍यक अशी ‘मॅच प्रॅक्‍टिस’ मिळाल्याने यजमानांचा विश्‍वास दुणावला आहे. फिजीला पराभूत केल्यानंतर उपांत्य फेरीत लेबनॉनशी लढत होण्याची शक्‍यता असून, या सामन्यात यजमानांचा कस लागणार आहे. जरी यजमानांचे पारडे भारी असले, तरी तगड्या लेबनॉनला कमी लेखण्याची चूक महागात पडू शकते.

अ गटात न्यूझीलंड - कोरिया ही उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगतदार  ठरण्याची शक्‍यता शक्‍यता आहे. या लढतीचा विजेता ऑस्टेलिया, चीन, जपान सह उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतो आणि पुढील वर्षी स्पेनमध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेत हेच चार संघ पात्र ठरणार असल्याने उद्याच्या लढतीत चांगला खेळ पाहायला मिळणार आहे.

Web Title: sports news women basketball competition