महिला बास्केटबॉल संघाचा पराभव

मुकुंद धस
मंगळवार, 23 जानेवारी 2018

चेन्नई - वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत सोमवारी पुरुषांपाठोपाठ महिला संघाचाही पराभव झाल्याने महाराष्ट्राचे आव्हान  संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीत छत्तीसगडने महाराष्ट्राचा ९०-६१ असा पराभव केला. छत्तीसगडच्या दांडग्या अनुभवी खेळाडूंपुढे महाराष्ट्राचे खेळाडू निष्प्रभ ठरले. छत्तीसगडच्या सीमा सिंग आणि अंजू लाक्रा या पस्तिशीतील खेळाडूंनी संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलताना तरुण प्रतिस्पर्ध्यांना धडा शिकवला. 

निकाल - उपांत्य पूर्व फेरी 
महिला - महाराष्ट्र ६१ 

(करीना मेनेझीस १८, मुग्धा अमरोतकर १७, श्रुती शेरीगर १०, शिरीन लिमये १०) पराभूत छत्तिसगढ ९०  (अंजू लाक्रा २६, पूनम चतुर्वेदी २२, संगीता कौर  १३, मेघा सिंग १२, सीमा सिंग १२)

Web Title: sports news women basketball team defeat