भारतीय महिलांचे ब्राँझपदक हुकले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

मुंबई - भारतीय महिला संघाने जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेतील अखेरच्या लढतीत अझरबैजानला हरवले खरे; पण जॉर्जियाने अमेरिकेचा सहज पराभव करीत भारताच्या ब्राँझपदकाच्या आशा संपुष्टात आणल्या. भारताच्या पुरुष संघासही चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

भारतास ब्राँझसाठी अमेरिकेने जॉर्जियाविरुद्धची हार टाळायला हवी होती. जॉर्जियाने ३-१ बाजी मारत भारताच्या अपेक्षांवर पाणी फिरवले. जॉर्जियाचे २१.५ गुण झाले; तर भारताचे २०. रशियाने (२५.५) चीनला मागे टाकत (२२) बाजी मारली. अझरबैजानविरुद्ध तानिया सचदेव पराजित झाली; पण ईशा करवडे, पद्मिनी राऊत, तसेच विजयालक्ष्मीने विजय मिळविला. 

भारतीय पुरुष संघाचे ब्राँझपदक विजेत्या पोलंडप्रमाणेच २०.५ गुण झाले; पण पोलंडने भारतापेक्षा एक मॅच पॉईंट (विजय, तसेच बरोबरीसाठी दिले जाणारे गुण) जास्त मिळवला. या स्पर्धेत चीनने विजेतेपद पटकाविले.

Web Title: sports news women chess competition