महिला क्रिकेटबाबत समिती

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

मुंबई - आयसीसी जागतिक एकदिवसीय महिला क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया-विरुद्ध भारताने मायदेशातील मालिका ०-३ अशी गमावली. या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ने समिती नियुक्त केली आहे. यात प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडल्जी, वन-डे संघाची कर्णधार मिताली राज, टी-२० कर्णधार हरमनप्रीत कौर, निवड समितीच्या प्रमुख हेमलता काला यांचा समावेश असून, प्रा. रत्नाकर शेट्टी निमंत्रक आहेत. २८ मार्च रोजी समितीची बैठक होईल. त्यात एकूणच प्रगतीच्या मार्गांविषयी चर्चा होईल.

मुंबई - आयसीसी जागतिक एकदिवसीय महिला क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया-विरुद्ध भारताने मायदेशातील मालिका ०-३ अशी गमावली. या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ने समिती नियुक्त केली आहे. यात प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडल्जी, वन-डे संघाची कर्णधार मिताली राज, टी-२० कर्णधार हरमनप्रीत कौर, निवड समितीच्या प्रमुख हेमलता काला यांचा समावेश असून, प्रा. रत्नाकर शेट्टी निमंत्रक आहेत. २८ मार्च रोजी समितीची बैठक होईल. त्यात एकूणच प्रगतीच्या मार्गांविषयी चर्चा होईल. डायना यांनी सांगितले, की वेगवान गोलंदाज, फिरकी गोलंदाज, यष्टिरक्षक यांचा संच तयार करावा आणि त्यांची राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीतील शिबिरात चाचणी घ्यावी, अशी सूचना निवड समितीला देण्यात आली आहे. संघाला आणखी 

दर्जेदार वेगवान व फिरकी गोलंदाजांची गरज असल्याचे या मालिकेतून दिसून आले. ते आपल्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध सहजतेने खेळले, तर आपल्याला झगडावे लागले. आपल्याला फलंदाजीतही जास्त आक्रमकतेची गरज आहे. 

आगामी काळात ईशान्येसह देशभरातून गुणवान खेळाडू हेरण्याची योजना मंडळ तयार करत आहे.

गेल्या वर्षी आपण विश्‍वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यापासून महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढली आहे. खेळाडूंना सरस करार मिळाले आहेत. आता सुविधा मिळत असल्यामुळे त्यांना सातत्यपूर्ण कामगिरी करावीच लागेल. महिला क्रिकेटमधील रस कायम ठेवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.
- डायना एडल्जी, माजी महिला कर्णधार

Web Title: sports news women cricket ICC india