यशोमालिका कायम राखल्याचा आनंद - हरेंद्र सिंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

मुंबई - भारतीय महिला हॉकी संघाने आशिया कप स्पर्धेत विजयी मालिका कायम राखत विजेतेपद जिंकले, त्याचा आनंद जास्त आहे. त्याचे श्रेय खेळाडूंना द्यायला हवे, असे मत भारतीय महिला हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंद्र सिंग यांनी व्यक्त केले. महिला हॉकी संघाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्याच स्पर्धेत भारतास विजेतेपद मिळवून दिले.

या विजयाचे श्रेय पूर्णपणे खेळाडूंना आहे. त्यांनी प्रत्येक सामन्यात योजनेनुसार खेळ केला. प्रत्येक सामन्यातून त्या शिकत होत्या. आपल्या चुकांवर मात करीत होत्या. त्यांना या विजयाचे श्रेय द्यायलाच हवे. त्यांचा त्यावर हक्कच आहे. या यशाने आम्ही विश्वकरंडकासाठी पात्र ठरलो आहोत. आता त्यासाठी आम्हाला कोणाच्या मदतीची गरज लागली नाही, असे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
विश्वकरंडकाची तयारी आम्ही लगेच सुरू करणार आहोत; मात्र या स्पर्धेत आपण चांगली कामगिरी करू शकतो हा विश्वास आम्हाला या विजेतेपदाने दिला आहे. या स्पर्धेत आम्ही टायब्रेकरपासून सर्व आव्हानांवर मात केली. आम्ही एकही लढत गमावली नाही, यासारखे खूप काही साध्य केले आहे. ते आमच्यासाठी मोलाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: sports news women hockey team asia world cup win