भारतीय महिला संघ डर्बीचा किल्ला राखणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

मुंबई - विश्‍वकरंडक महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वास हादरे देणेही सोपे नसते, तरीही गुरुवारच्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारतास संधी असेल असे अनेक माजी क्रिकेटपटूंचे मत आहे. भारतीय महिला संघाने आतापर्यंत राखलेला डर्बीचा अभेद्य किल्ला संघाचा आत्मविश्‍वास उंचावत आहे.

भारताने या स्पर्धेतील डर्बीतील आतापर्यंतच्या चारही लढती जिंकल्या आहेत. त्यात त्यांनी यजमान इंग्लंडलाही हरवले होते. ऑस्ट्रेलिया यंदा प्रथमच येथे डर्बीत खेळणार आहे. येथील चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद भारतास लाभतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोरील आव्हान खडतर मानले जात आहे.

ऑस्ट्रेलियाने साखळीत भारतास सहज हरवले होते, पण न्यूझीलंडविरुद्ध अनेकांना अपेक्षित नसताना भारताने सहज बाजी मारली. दडपणाखाली मिळवलेला हा विजय नक्कीच मोलाचा आहे.  इंग्लंड, न्यूझीलंडला हरवलेला हा संघ ऑस्ट्रेलियासही धक्का देऊ शकतो, असेच मानले जात आहे. मिताली राजची बहरलेली फलंदाजी तसेच गोलंदाजांना अनुकूल असलेले वातावरण भारताचा आत्मविश्‍वास उंचावण्यास नक्कीच मदत करेल.

Web Title: sports news women worldcup cricket competition