महिला कुस्तीगीरांचीही निराशाजनक सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

पूजाने चिनी प्रतिस्पर्धीविरुद्ध आघाडी दवडली

मुंबई - जागतिक कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्या दिवशी भारतीय पदकाची पाटी कोरीच राहिली. मात्र त्यातही ५८ किलो गटात पूजाने चीनच्या निंगनिंग रोन्गविरुद्ध (८-०) दवडलेली आघाडी निश्‍चित सलत असेल. 

पूजाने चिनी प्रतिस्पर्धीविरुद्ध आघाडी दवडली

मुंबई - जागतिक कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्या दिवशी भारतीय पदकाची पाटी कोरीच राहिली. मात्र त्यातही ५८ किलो गटात पूजाने चीनच्या निंगनिंग रोन्गविरुद्ध (८-०) दवडलेली आघाडी निश्‍चित सलत असेल. 

पॅरीसला सुरू असलेल्या या स्पर्धेतील महिला कुस्तीच्या भारतीय मोहिमेस छान सुरवात झाली. पूजाने फ्रान्सच्या सोनिया मिशेल बाऊडीन हिला ३६ सेकंदांतच चीत केले. दुसऱ्या फेरीत चिनी प्रतिस्पर्धीविरुद्ध आत्मविश्‍वासपूर्वक सुरवात केलेल्या पूजाने ८-० अशी सुरवात केली. पण दुसऱ्या फेरीत पूजाने ८ गुण गमावले. या तीन मिनिटांत स्पर्धकांचा चांगलाच कस पणास लागला होता. पूजाने एखादा गुण जरी कमावला असता तरी ती जिंकू शकली असती, पण पण अखेर तिला ८-१२ हार पत्करावी लागली.

ललिता सहरावत हिने ५५ किलो गटात पोलंडच्या पाऊल कोयलेवा हिच्याविरुद्ध सुरवातीस वर्चस्व राखले होते. त्यात पाऊलचा खांदा दुखावला होता. त्याचा फायदा घेत ललिताने ३-० बाजी मारली. पण त्यानंतरच्या लढतीत रशियाच्या मारिया गुरोवा हिने तिला प्रतिकाराची संधी दिली नाही. 

शिल्पी शेरॉन यादव मंगोलियाच्या ओरखोल पुरेद्वॉर्जविरुद्ध सलामीला ०-१० अशी हरली, पण ओरखोलने अंतिम फेरी गाठल्याने शिल्पीला संधी मिळाली, पण तिला रिपेचेजच्या सलामीच्या लढतीत स्वीडनच्या हीना कॅटारिना हिने ५५ सेकंदांत चीत केले. ७५ किलो गटात पूजा सिहागने पात्रता फेरीत इजिप्तच्या हमजा इब्राहीमला हरवले खरे, पण ती पहिल्या फेरीत कॅनडाच्या ज्सीटना रेनी डि स्टासिओ हिने पूजाला ७-० असे हरवले.

Web Title: sports news women wrestling competition