भारतीय महिलांचे आव्हान संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पराभवाचे चक्र कायम राहिले. सलग तिसरा पराभव झाल्यामुळे महिलांच्या तिरंगी ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३६ धावांनी पराभव केला. मेगान स्कटने केलेली हॅटट्रिक भारतीय फलंदाजीची कंबरडे मोडणारी ठरली.

दक्षिण आफ्रिकेत कमालीचे यश मिळवल्यानंतर मायदेशात मात्र पराभवाने भारतीय संघाची पाठ सोडलेली नाही. 

ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ बाद १८६ धावांपर्यंत मजल मारली. बेथ मूनी आणि एल्सी विलानी यांची आक्रमक अर्धशतके भारतीयांची गोलंदाजी निष्प्रभ करणारी ठरली. फलंदाजीत भारतीयांना हे आव्हान पेलवलेच नाही. २० षटकांत पाच फलंदाजांच्या मोबदल्यात १५० धावांच करता आल्या. 

भारतासाठी स्मृती मनधनाची आक्रमक फलंदाजी आशेचा किरण दाखवणारी होती; पण आज ती पहिल्याच षटकात बाद झाली आणि धावांचा वेग पुढे वाढलाच नाही. मेगान स्कटने आपल्या पहिल्या षटकातील अखेरच्या दोन-दोन चेंडूंवर स्मृती आणि मिताली राज यांना बाद केल्यावर आपल्या पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूवर दीप्ती शर्माला माघारी धाडून हॅटट्रिक केली. 

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ः २० षटकांत ५ बाद १८६ (बेथ मूनी ७१ -४६ चेंडू, ८ चौकार, एल्सी विलानी ६१ -४२ चेंडू, १० चौकार, पूजा वस्त्रकर २-२८) वि. वि. भारत ः २० षटकांत ५ बाद १५० (जेमिह रॉड्रिग्ज ५० -४१ चेंडू, ८ चौकार, हरमनप्रीत कौर ३३, अनुजा पाटील ३८, 
स्कट ३-३१)

Web Title: sports news Women's Tri-series Twenty20 cricket india vs australia