वर्ल्डकप फुटबॉलच्या लोकप्रियतेचा भारतीय फुटबॉलला फायदा - भट्टाचार्य

पीटीआय
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

कोलकता - ऑक्‍टोबरमध्ये होत असलेल्या फिफा १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेमुळे फुटबॉलच्या लोकप्रियतेची लाट येईल आणि त्याचा फायदा देशातील फुटबॉल क्रांतीसाठी होईल, असा विश्‍वास स्पर्धा संचालक जॉय भट्टाचार्य यांनी व्यक्त केला.

भारतात प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. त्यामध्ये मिशनल इलेव्हन मिलियन आणि करंडक पाहण्याचा अनुभव अशा कार्यक्रमांचा यामध्ये समावेश आहे.  या स्पर्धेचे ज्या ठिकाणी सामने होणार आहेत, तेथे ऑनलाईन तिकीट विक्री सुरू झाली आहे. कोलकात्यात तर जबरदस्त पाठिंबा मिळत आहे. कोलकात्यातील ज्या प्रेक्षकांना साखळी सामन्यांची तिकिटे मिळणार नाहीत, त्यांनी निराश होण्याचे कारण नाही. बाद फेरीच्या सामन्यांची तिकिटे उपलब्ध होऊ शकतील, असे भट्टाचार्य म्हणाले. दिल्लीमध्ये भारताचे साखळी सामने होणार आहेत. भारताच्या या सामन्यांच्या तिकिटांना जोरदार ऑनलाइन मागणी असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: sports news World Cup Football