विश्‍वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेत विदीतने दवडली विजयाची संधी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

टिब्लीसी (जॉर्जिया) - विश्‍वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत भारताचा ग्रॅंडमास्टर विदीत गुजराथीने चीनच्या डिंग लिरेनविरुद्ध पहिल्या डावात विजयाची संधी दवडली. 

टिब्लीसी (जॉर्जिया) - विश्‍वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत भारताचा ग्रॅंडमास्टर विदीत गुजराथीने चीनच्या डिंग लिरेनविरुद्ध पहिल्या डावात विजयाची संधी दवडली. 

लिरेनचे २७७१ एलो रेटींग असून तो जागतिक क्रमवारीत १३वा आहे. विदीतचे एलो रेटींग २७०२ असून तो ४१वा आहे. विदीतकडे काळी मोहरी होती. डींगने इंग्लीश ओपनिंग (प्यादे सी ४) पद्धतीने सुरवात केली. नंतर चालीत ‘इंग्लीश सिमेट्रीकल’ पद्धतीत रूपांतरीत झाला. प्रारंभीच विदीतने ‘डी ४’ घरातील प्यादे लिरेनला डोकेदुखी करून ठेवले. २७व्या चालीस वजीराची ‘जी ४’ चाल केली असती तर विदीतला हमखास विजयाची संधी मिळू शकली असती, पण त्याने हत्तीची (डी) ‘बी ८’ ही चाल केली. यामुळे पटस्थिती बरोबरीत आली. ३८व्या चालीनंतर अखेर विदीतला एक गुण वाटून घ्यावा लागला. रविवारी विदीतला दुसऱ्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याची संधी असेल.

एस. पी. सेतुरामन (२६१७) याने जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी नेदरलॅंड्‌सच्या अनिश गिरी (२७७७) याला बरोबरीत रोखले. ग्युओको पियानो ओनपिंग पद्धतीचा डाव ४० चालींत बरोबरीत सुटला. दुसऱ्या डावात सेतुरामनकडेही पांढरी मोहरी असतील. दरम्यान, मॅग्नस कार्लसनला (२८२७) याला प्रथमच पराभूत व्हावे लागले. चीनच्या बू झियांग झी याने काळ्या मोहऱ्यांसह त्याला हरविले.

Web Title: sports news worldcup chess competition