जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताची पाटी कोरीच

पीटीआय
रविवार, 27 ऑगस्ट 2017

पॅरिस - जागतिक कुस्ती स्पर्धेत एकही पदक न मिळवता भारतीयांचे आव्हान संपुष्टात आले. बजरंग पुनिया आणि प्रवीण राणा यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठून अपेक्षा उंचावल्या होत्या; परंतु त्यांनीही निराशा केली. शनिवारी झालेल्या फ्रिस्टाईल गटात बजरंग (६५ किलो), प्रवीण राणा (७४), अमित धानकर (७०) आणि सत्यव्रत कादियान (९७) आपापल्या गटात पराभूत झाले. बजरंग आणि प्रवीण यांनी पदकाचा दिलासा दाखवला होता; परंतु निर्णायक क्षणी ते अपयशी ठरले.

आशियाई विजेत्या असलेल्या पुनियाचा जॉर्जियाच्या झुराबी लाकोबिशवेलीकडून चुरशीच्या लढतीत ५-६ असे पराभव झाला. राणासमोर युरोपियन विजेत्या अझरबैजनच्या जाब्राईल हास्नोवचे आव्हान होते. हास्नोवने रिओ ऑलिंपिक स्पर्धेत ब्राँझपदकही जिंकलेले होते. तो भारताच्या राणाविरुद्ध सरस ठरला. त्याने ही लढत ५-० अशी जिंकली.

अमित धानकरनेही अशीच साफ निराशा केली. पात्रता फेरीतच तो कझाकिस्तानच्या अक्‍झुरेक तानातोरोवरकडून २-९ असा पराभूत झाला; तर कादियननेही अर्मेनियाच्या जॉर्जी केतोवविरुद्ध ०-५ अशी हार स्वीकारली.

Web Title: sports news Wrestling Championship india