ग्यानेंद्र दहियाने चिनी कुस्तीगिरास हरवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई - भारताच्या ग्यानेंद्र दहियाला जागतिक कुस्ती स्पर्धेत मंगळवारी रेपिचेज गटात पराभव पत्करावा लागल्याने भारताला पदकाजवळ जाऊनही पदकापासून वंचित राहावे लागले. अर्थात, ग्रीको रोमन प्रकारांत ५९ किलो वजनी गटाच्या पहिल्या फेरीत चीनच्या कुस्तीगिरास हरवल्याचे समाधान ग्यानेंद्रला मिळाले. ही स्पर्धा पॅरिसमध्ये सुरू आहे.

चीनबरोबरील तणावामुळे या कुस्तीकडे सर्व भारतीय संघाचे लक्ष होते. त्यात ग्यानेंद्रने बाजी मारली. एवढेच नव्हे, तर रिपेचेज प्रकारातही त्याने लढती जिंकत पदकाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. ग्यानेंद्रने ५९ किलो गटात चीनच्या लिबिन डिंग याला हरवून भारतास स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला. ग्यानेंद्र दुसऱ्या फेरीत कझाकस्तानच्या मिराम्बेक ऐनागुलोव याच्याविरुद्ध पराजित झाला; पण मिराम्बेकने अंतिम फेरी गाठल्याने ग्यानेंद्रला जीवदान मिळाले. त्याने रेपिचेज प्रकारात इजिप्तच्या मोस्तफा महंमद याला हरवून रेपिचेजमधील दुसरी फेरी गाठली. या फेरीत युक्रेनच्या डी स्यिमबॅलीउक याच्याविरुद्ध पराजित झाल्याने भारताच्या पदकाच्या आशा संपुष्टात आल्या.  
हरप्रीत सिंग (८० किलो), रविंदर (६६ किलो) आणि नवीन (१३० किलो) हे भारताचे अन्य मल्ल पहिल्याच फेरीत पराभूत झाले.

Web Title: sports news wrestling competition