मंगोलिया स्पर्धेद्वारे मेरी कोमचे पुनरागमन

पीटीआय
मंगळवार, 30 मे 2017

नवी दिल्ली - मंगोलियातील निमंत्रित स्पर्धेद्वारे मेरी कोम आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंगमध्ये पुनरागमन करणार आहे. रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्यात अपयश आल्यानंतर मेरी जवळपास एका वर्षानंतर बॉक्‍सिंग स्पर्धा खेळणार आहे.

मेरी कोम ५१ किलो गटात सहभागी होईल. ही स्पर्धा २० ते २६ जूनदरम्यान होणार आहे. ‘‘मी ४८ किलो गटातच खेळणार आहे; पण सरावासाठी या स्पर्धेत ५१ किलो गटात खेळणार आहे. नोव्हेंबरमधील आशियाई स्पर्धेत ४८ किलो गटातच खेळणार आहे,’’ असे मेरीने स्पष्ट केले.

राष्ट्रकुल स्पर्धा संयोजकांनी २०१८च्या स्पर्धेत ४८ किलो गटाची स्पर्धा घेण्याचे ठरवल्यावर मेरीने या गटात खेळण्याचे ठरवले. मेरीने २०१० नंतर जागतिक स्पर्धा जिंकलेली नाही, पण ते विजेतेपद ४८ किलो गटातील होते. ऑलिंपिक सहभागासाठी तिने ५१ किलो गटात खेळण्याचे ठरवले आणि २०१२ च्या लंडन स्पर्धेत ब्राँझही जिंकले. तसेच २०१४ च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकही जिंकले होते.

गेले सहा महिने कसून सराव करीत आहे. त्याचा मंगोलियात फायदा होईल, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. मंगोलिया स्पर्धेत प्रियांका चौधरी (६० किलो) तसेच कलावती (७५ किलो) यांचाही सहभाग असेल.

Web Title: sprots news Mary Kom