स्क्वॅशपटू आदित्य अंतिम फेरीत 

वृत्तसंस्था
रविवार, 13 मे 2018

आठव्या मानांकित स्पेनच्या ह्युगो वॅरेला याला 11-9, 4-11, 11-2, 11-2 असा धक्का दिला. मुंबईकर आदित्यने पात्रता फेरीत दोन सामने जिंकले.

 

चेन्नई - भारताचा स्क्वॅशपटू आदित्य जगतापने अमेरिकेतील लॉंग आयलंडमधील सिटी व्ह्यू ओपन पीएसए वर्ल्ड टूर स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. त्याने पात्रता फेरीतून आगेकूच केली असून आतापर्यंत तिन्ही फेऱ्यांत मानांकित प्रतिस्पर्ध्यांना हरवून सनसनाटी निकाल नोंदविला आहे. त्याने आठव्या मानांकित स्पेनच्या ह्युगो वॅरेला याला 11-9, 4-11, 11-2, 11-2 असा धक्का दिला. मुंबईकर आदित्यने पात्रता फेरीत दोन सामने जिंकले.

मुख्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीत त्याने तृतीय मानांकित तृतीय मानांकित ईजिप्तच्या अहमद होस्नीला, दुसऱ्या फेरीत सहाव्या मानांकित अमेरिकेच्या स्पेन्सर लव्हजॉयला हरविले होते. अंतिम सामन्यात त्याच्यासमोर बोट्‌स्वानाच्या ऍलिस्टर वॉकर याचे आव्हान असेल. वॉकरला पाचवे मानांकन आहे. 
 

Web Title: Squash player Aditya are in finals