श्रीशांतवरील बंदी कमी केली

वृत्तसंस्था
Wednesday, 21 August 2019

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्‍सिंगचे आरोप करण्यात आलेला माजी वेगवान गोलंदाज श्रीशांतवरची बंदी कमी करण्यात आली असून ती पुढील ऑगस्टमध्ये संपणार आहे. श्रीशांतने अगोदरच सहा वर्षांच्या बंदी सामना केलेला आहे, असे बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली - आयपीएलमध्ये स्पॉट फिक्‍सिंगचे आरोप करण्यात आलेला माजी वेगवान गोलंदाज श्रीशांतवरची बंदी कमी करण्यात आली असून ती पुढील ऑगस्टमध्ये संपणार आहे. श्रीशांतने अगोदरच सहा वर्षांच्या बंदी सामना केलेला आहे, असे बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी स्पष्ट केले.

आयपीएलमध्ये (२०१३) स्पॉट फिक्‍सिंग केल्याचे आरोप ठेवत बीसीसीआयने श्रीशांतसह अजित चंडेला, अंकीत चव्हाण यांच्यावर बंदी घातली होती, परंतु १५ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या शिस्तपाल समितीचा निकाल बाजूला केला आणि त्याच्या बंदीचा फेरविचार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही घडामोड घडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sreesanth ban reduced