VIDEO: श्रीसंतने 9 वर्षानंतर मिळालेल्या विकेटला घातला 'साष्टांग'

Sreesanth Took 1st Wicket after 9 Years gave his Pranaam
Sreesanth Took 1st Wicket after 9 Years gave his Pranaam esakal

भारताचा मॅच फिक्सिंगचे आरोप झालेला वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत (Sreesanth) तब्बल 9 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरला. तब्बल 9 वर्षानंतर त्याने केरळकडून खेळताना रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेत पहिली विकेट (Sreesanth 1st Wicket After 9 years) घेतली. ही विकेट घेतल्यानंतर तो भावूक झाला होता. त्याने विकेनंतर केलेल्या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ (Sreesanth Wicket Celebration Video) संध्या व्हायरल होत आहे.

मॅच फिक्सिंगचे (Match Fixing) आरोप होण्यापूर्वी तो ज्यावेळी भारतीय संघाकडून खेळत होता त्यावेळी श्रीसंत आपल्या स्विंग गोलंदाजीबरोबरच विचित्र हावभावासाठी देखील प्रसिद्ध होता. तो कधी कधी भावनेच्या भरात असे काही हावभाव करत होता की त्याला त्याबद्दल दंड देखील व्हायचा. त्याची आपली विकेट अनोख्या पद्धतीने सेलिब्रेट करण्याची सवय 9 वर्षाच्या बंदीनंतरही गेलेली नाही.

श्रीसंतने केरळ विरूद्ध मेघायल सामन्यात अरूण बोराला बाद केले. श्रीसंतने या सामन्यात 40 धावात 2 बळी टिपले. केरळने हा सामना 166 धावांनी जिंकला. केरळच्या रोहन कुन्नूमलने 107 धावांची शतकी खेळी केली. मात्र या सगळ्यात श्रीसंतने 9 वर्षानंतर घेतलेल्या पहिल्या विकेटची चर्चा झाली. श्रीसंतने 9 वर्षानंतर घेतलेल्या आपल्या पहिल्या विकेटचा व्हिडिओ शेअर केला आहे. याला त्याने 'ही माझी 9 वर्षानंतरची पहिली विकेट आहे. देवाची कृपा मी त्यावेळी खूप आनंदी झालो होते. मी त्या विकेटला साष्टांग घातला.' असे कॅप्शनही दिले आहे.

श्रीसंतने भारताकडून 27 कसोटी, 53 वनडे आणि 10 टी 20 सामने खेळले आहेत. श्रीसंतने जरी पुनरागमन केले असले तरी रणजी ट्रॉफीतील गुजरात विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याला रूग्णालयात दाखल करावे लागल्याने तो मध्य प्रदेश विरूद्धच्या सामन्यात देखील खेळण्याची शक्यता कमी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com