मलेशिया ओपनः श्रीकांत आणि सिंधूची उपांत्य फेरीत धडक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 जून 2018

मलेशियाः मलेशिया ओपनमध्ये आज झालेल्या सामन्यांमध्ये किदांबी श्रीकांत आणि पी.व्ही.सिंधू या दोघांनीही स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. 

मलेशियाः मलेशिया ओपनमध्ये आज झालेल्या सामन्यांमध्ये किदांबी श्रीकांत आणि पी.व्ही.सिंधू या दोघांनीही स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. 

साईना नेहवाल पहिल्याच फेरीत बाद झाल्यानंतर श्रीकांत आणि सिंधूने उत्तम खेळ करत भारतीयांच्या आशा कायम ठेवल्या. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने फ्रान्सच्या ब्रिस लेव्हरडेजला 21-19, 21-11 असे सहज पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये श्रीकांत तीन गुणांनी मागे होता. मग मात्र त्याने सलग चार गुण कमावले. तर दुसऱ्या सेटमध्ये त्याने 11-5 अशी आघाडी घेतली आणि लेव्हरडेजला शेवटपर्यंत श्रीकांतची बरोबरी करता आली नाही. 
  
महिला एकेरीमध्ये सिंधूने कट्टर प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरीनला अटीतटीच्या सामन्यात 22-20, 21-19 असे पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये दोघींनी एकमेकींच्या बॅकहॅन्डवर लक्ष्य करत शॉर्टस मारले. एका क्षणी सिंधूकडे 18-15 अशी आघाडी होती मात्र मरीनने उत्तम खेळ करत सलग पाच गुण कमावले. यानंतर सिंधूने मरीनच्या पूर्ण बाहेर पडलेल्या शॉर्टला आव्हान दिले आणि त्यामुळे मरीनची लय तुटली आणि याचाच फायदा घेत सिंधूने हा सेट 21-19 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने 13-6 अशी आघाडी घेऊनही मरीनने आठ गुण कमावले. सिंधूने मात्र महत्त्वाच्या सर्व रॅली जिंकत सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लावला. 

Web Title: Srikanth and Sindhu into semi finals of Malaysia Open