World Cup 2019 : आव्हान होते तेवढेच; मात्र, विंडीजचा श्रीलंकेला कडवा प्रतिकार 

World Cup 2019 : आव्हान होते तेवढेच; मात्र, विंडीजचा श्रीलंकेला कडवा प्रतिकार 

वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : उपांत्य फेरीच्या लढाईसाठी चुरस वाढलेली असताना भारताने अंतिम टप्यात शस्त्र म्यान केली, पण प्रगती करण्याची कोणतीही शक्‍यता नसताना वेस्ट इंडीजनेने तेवढ्याच धावसंखेसाठी श्रीलंकेविरुद्ध शर्थ केली. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन दिवसांतील सामन्यांचा हा फरक ठरला. 

रविवारी 337 धावांच्या आव्हानासमोर भारताला 306 धावा करता आल्या, पण आज 338 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजने 315 धावा केल्या. हा सामना त्यांनी 23 धावांनी गमावला पण त्यांनी पाठलाग सोडला नाही. निकोलस पूरनने 118 धावांची झुंझार खेळी केली. वेस्ट इंडीजचे स्पर्धेतील आव्हान अगोदरच संपुष्टात आलेले आहे मात्र श्रीलंकेच्या आशामध्ये धुगधुगी राहिली आहे. 

भल्यामोठ्या आव्हानासमोर आम्ब्रिस आणि होप लवकर बाद झाल्यावर ख्रिस गेलने छोटेखानी तडाखा दिला, पण त्यानंतर इतरांनी निराशा केली तरी पूरने एका बाजूने शतकी साकारत होता, पण तीन फलंदाज धावचीत झाले तरी अलेनने वेगवान अर्धशतक करून रंगत कायम ठेवली होती, अखेर पूरन बाद झाल्यावर विंडीजचा पराभव निश्‍चित झाला. 
तत्पूर्वी अविष्का फर्नांडोच्या शानदार शतकामुळे श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 338 धावा उभारल्या. 

गेल्या तीन सामन्यांपासून अविष्काला संधी देण्यात आली. त्याची आक्रमक फलंजाजी प्रभाव पाडत होती, परंतु संयमाचा अभाव असल्याने जम बसल्यानंतर त्याने विकेट गमावल्या होत्या. आज मात्र संयमाला अधिक पसंती देत मोठी खेळी करण्याचा इरादा त्यांनी बांधला आणि त्याची फलश्रुती शतकात रूपांतर करणारी ठरली. 

अंतिम टप्प्यात श्रीलंकेच्या डावाला आणखी वेग मिळवून देण्याची जबाबदारी लाहिरू थिरीमनने पार पाडली त्याने 33 चेंडूत 45 धावांचा तडाखा दिला. आता गमावण्यासारखे काहीच नसल्यामळे वेस्ट इंडीजच्या गोलंदाजीप्रमाणे क्षेत्ररक्षणातही ढिलाई दिसून येत होती. 

संक्षिप्त धावफलक : 50 षटकांत 6 बाद 338 (दिमुथ करुणारत्ने 32- 48 चेंडू, 4 चौकार, कुशल परेरा 64- 51 चेंडू, 8 चौकार, अविष्का फर्नांडो 104- 103 चेंडू, 9 चौकार, 2 षटकार, कुशल मेंडिस 39- 41 चेंडू, 4 चौकार, लाहिरू थिरिमने नाबाद 45- 33 चेंडू, 4 चौकार, जेसन होल्डर 10-0-59-2, फॅबिन अलेन 8-0-44-1) वि. वि. वेस्ट इंडीज ः 50 षटकांत 9 बाद 315 (ख्रिस गेल 35 -48 चेंडू, 1 चौकार, 2 षटकार, निकोलस पूरन 118 -103 चेंडू, 11 चौकार, 4 षटकार, फॅबिन अलेन 51 -32 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, मलिंगा 10-0-55-3, अँजेलो मॅथ्यूज 1-0-3-1)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com