सिंधू जागतिक क्रमवारीत पुन्हा दुसरी?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई - कोरिया सुपर सीरिज विजेतेपदामुळे पी. व्ही. सिंधू जागतिक क्रमवारीत पुन्हा दुसरे स्थान मिळवण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. सध्या सिंधू चौथ्या क्रमांकावर आहे. 

सिंधूला कोरिया विजेतेपदाबद्दल ९,२०० गुण मिळतील. तिचा गतवर्षी या स्पर्धेत सहभाग नव्हता. त्यामुळे या स्पर्धेबद्दलचे तिचे गुण कमी होणार नाहीत.

त्यामुळे गेल्या ५२ आठवड्यांतील सर्वांत कमी गुण मिळालेला टप्पा रद्द होईल, अर्थातच ५,०२० गुण रद्द होतील. यामुळे तिचे एकंदर गुण ७६,९४६ वरून ८१,१०६ होतील. सिंधू अर्थातच गतविजेती अकेन यामागुची आणि गतउपविजेती सुंग जी ह्यून यांना मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये तिने इंडिया ओपन सुपर सीरिज जिंकून हा क्रमांक मिळविला होता. यामागुची उपांत्य फेरीत पराजित झाली होती, तर सुंग उपांत्यपूर्व फेरीत अर्थातच दोघींना गुणांचा मोठा फटका बसणार आहे.

Web Title: ssports news p. v. sindhu second in global ranking