वरिष्ठ गट राज्य अजिंक्‍यपद कुस्ती यजमान पुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

पुणे :  प्रतिष्ठेच्या "महाराष्ट्र केसरी' किताबापासून पुणे शहर संघास दूर राहावे लागले असले, तरी राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 60व्या अधिवेशनात पुणे संघाने 94 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठानने या स्पर्धेचे वारजे येथे आयोजन केले होते.

पुणे :  प्रतिष्ठेच्या "महाराष्ट्र केसरी' किताबापासून पुणे शहर संघास दूर राहावे लागले असले, तरी राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 60व्या अधिवेशनात पुणे संघाने 94 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठानने या स्पर्धेचे वारजे येथे आयोजन केले होते.

या स्पर्धेत पुण्यातील मल्लांची ताकद भारी पडली. त्यांना गादी विभागात कोल्हापूरच्या मल्लांनी आव्हान दिले; पण ते माती विभागात कमी पडल्याने सर्वसाधारण विजेतेपदाची माळ पुणे संघाच्या गळ्यात पडली. कोल्हापूरला 82 गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कोल्हापूरने गादी विभागात 56 गुणांसह गट विजेतेपद मिळविले. याच विभागात पुणे संघाने 45 गुणांची कमाई केली. माती विभागात पुण्याचे वर्चस्व राहिले. त्यांनी 49 गुणांसह गटविजेतेपद मिळविले. कोल्हापूरला मात्र या गटात केवळ 26 गुणच मिळवता आले.

अंतिम निकाल (अनुक्रमे पहिले सुवर्ण, रौप्य आणि ब्रॉंझपदक) ः
गादी विभाग 57 किलो ः विजय पाटील (कोल्हापूर जिल्हा), अभिजित पाटील (कोल्हापूर शहर), पंकज पवार (लातूर) व बापू कोळेकर (सांगली), 61 किलो ः तुकाराम शितोळे (पुणे जिल्हा), रावसाहेब घोरपडे (पुणे शहर), तानाजी दाताळ (नगर) व शुभम थोरात (पुणे शहर-ब), 65 किलो ः उत्कर्ष काळे (पुणे शहर), सागर लोखंडे (पुणे जिल्हा), अक्षय हिरगुडे (कोल्हापूर जिल्हा) व संभाजी दाताळ (नगर), 70 किलो ः कुमार शेलार (कोल्हापूर जिल्हा), राकेश तांबुळकर (कोल्हापूर शहर), दिनेश मोकाशी (पुणे जिल्हा) व अक्षय चोरघे (पुणे शहर), 74 किलो ः रणजीत नलावडे (कोल्हापूर जिल्हा), अक्षय मोडक (पुणे शहर), मच्छिंद्र भोयर (हिंगोली) अण्णा जगताप (सोलापूर जिल्हा), 86 किलो ः संजय सूळ (सातारा), अनिकेत खोपडे (पुणे शहर), प्रसाद सस्ते (पिंपरी-चिंचवड), शिवाजी पवार (सोलापूर जिल्हा), 97 किलो ः संग्राम पाटील (कोल्हापूर जिल्हा), शिवराज राक्षे (पुणे जिल्हा), संतोष गायकवाड (अहमदनगर) व सुनील शेवतकर (सोलापूर जिल्हा), 86 ते 125 किलो (महाराष्ट्र केसरी) ः अभिजित कटके (पुणे शहर), सागर बिराजदार (लातूर), ज्ञानेश्‍वर जमदाडे (सोलापूर), कौतुक डाफळे (कोल्हापूर जिल्हा)

माती विभाग 57 किलो ः सागर मारकड (पुणे जिल्हा), सौरभ पाटील (कोल्हापूर जिल्हा), ज्योतीबा आटकळे (सोलापूर जिल्हा), 61 किलो ः सूरज कोकाटे (पुणे जिल्हा), सौरभ शिंदे (पुणे शहर), आकाश अस्वले (सोलापूर), 65 किलो ः प्रथम- माणिक कारंडे (कोल्हापूर शहर), सोनबा गोंगाणे (कोल्हापूर जिल्हा), आबासाहेब मदने (सोलापूर जिल्हा), 70 किलो ः अरुण खेंगले (पुणे जिल्हा), असपाक शहा (औरंगाबाद जिल्हा), अनिल चव्हाण, 74 किलो ः रवींद्र करे (पुणे जिल्हा), हनुमंत पुरी (उस्मानाबाद), भगतसिंग खोत (कोल्हापूर जिल्हा), 86 किलो ः दत्तात्रय नरळे (सोलापूर जिल्हा), जयदीप गायकवाड (सातारा), अनिल जाधव (नांदेड), 97 किलो ः जयपाल वाघमोडे (सांगली), तानाजी झुंजुरके (पुणे जिल्हा), संदीप काळे (मुंबई उपनगर पूर्व) 86 ते 125 किलो (महाराष्ट्र केसरी) ः विजय चौधरी (जळगाव), विलास डोईफोडे (जालना), मारुती जाधव (सांगली)

Web Title: State Championship Wrestling