राज्य खो-खो संघटनेची पूरग्रस्त खेळाडूंना मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा फटका बसलेल्या खो-खो खेळाडू, पंच तसेच मार्गदर्शकांना राज्य संघटनेने आर्थिक साह्य केले आहे.

मुंबई L सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा फटका बसलेल्या खो-खो खेळाडू, पंच तसेच मार्गदर्शकांना राज्य संघटनेने आर्थिक साह्य केले आहे.

भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजित जाधव यांनी राज्यातील खो-खो परिवाराला मदतीचे आवाहन केले. त्यास चांगला प्रतिसाद लाभला आणि सात लाखांचा मदतनिधी जमा झाला. तसेच 12 लाखांचे साहित्य जमा झाले. राज्य संघटनेशी सर्व जिल्ह्यातील खेळाडूु, पंच, मार्गदर्शक तसेच पदाधिकारी यांनी या आवाहनानुसार साह्य केले.

अवघ्या काही दिवसात जमा झालेला हा निधी 60 पूरग्रस्त खेळाडू, पंच तसेच मार्गदर्शकांना नुकसानीचे स्वरूप पाहून देण्यात आला. रोख रक्कम पाच ते वीस हजार होती. आपल्या खेळाडूंना थेट मदत करणारी राज्य खो-खो संघटना ही राज्यातील एकमेव क्रीडा संघटना आहे, असे जाधव यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state kho kho association help flood affacted players