स्टर्लिंगची हॅट्ट्रिक, सिटीचा दबदबा

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑगस्ट 2019

रहीम स्टर्लिंगच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर गतविजेत्या मॅंचेस्टर सिटीने प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये विजयी सलामी दिली. दरम्यान, हॅरी केन याने अखेरच्या मिनिटात केलेल्या गोलमुळे लिव्हरपूलने सुरुवातीच्या पिछाडीनंतर व्हिलाचा 3-1 पाडाव केला.

लंडन : रहीम स्टर्लिंगच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर गतविजेत्या मॅंचेस्टर सिटीने प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये विजयी सलामी दिली. दरम्यान, हॅरी केन याने अखेरच्या मिनिटात केलेल्या गोलमुळे लिव्हरपूलने सुरुवातीच्या पिछाडीनंतर व्हिलाचा 3-1 पाडाव केला.

पेप गॉर्डिआला यांचे मार्गदर्शन लाभलेल्या सिटीने जोरदार सुरुवात करताना वेस्ट हॅमचा 5-0 असा धुव्वा उडवला. मात्र सिटीच्या या विजयापेक्षा व्हिडीओ असिस्टंट रेफरी अर्थात वारची चर्चा जास्त झाली. ही लढत अनेकदा वारने रोखली गेली. रहीम स्टर्लिंगचा एक गोल तो ऑफसाईड असल्याचा निर्णय वारने दिला; तर सर्जिओ ऍग्यूएरा याची किक रोखल्यावर त्याला ती घेण्याची पुन्हा संधी देण्यात आली. वार या स्पर्धेत चुका करणार नाहीत अशी अपेक्षा गॉर्डिआला यांनी केली.

गतमोसमात सिटीने लिव्हरपूलला एका गुणाने मागे टाकत बाजी मारली होती. लिव्हरपूलने सराव सामन्यात आपली जोरदार तयारी दाखवली होती; पण सिटीने विजयी सलामी देताना लिव्हरपूलसमोरील आव्हान सोपे नाही याची जाणीव करून दिली. सिटीला पूर्वार्धात एकच गोल करता आला होता. पण स्टर्लिंगच्या तीन गोलनी लढत अखेर एकतर्फी केली.

जॉन मॅकगिन याचा गोल मोसमाच्या सुरुवातीसच लिव्हरपूलला धक्का देण्याची चिन्हे दिसत होती, पण दोम्बेले याने 73 व्या मिनिटास लिव्हरपूलला बरोबरी साधून दिल्यावर चित्र बदलले. हॅरी केनने चार मिनिटांत दोन गोल करीत लिव्हरपूलचा विजय अधिक सोपा केला. उत्तरार्धात जास्त जोषपूर्ण खेळ केल्याचा फायदा झाल्याचे केनने सांगितले.

ग्रॅहम पॉटर यांना विजयी मार्गदर्शनाची संधी देताना ब्रायटनने एफए कप उपविजेत्या वॅटफोर्डला 3-0 हरवले. बर्नलीने याच फरकाने साऊदम्प्टनचा पराभव केला. क्रिस्टल पॅलेसला एव्हर्टनने गोलशून्य रोखले. शेफिल्ड युनायटेडने बोर्नमाऊथविरुद्धची लढत 1-1 बरोबरीत सोडवली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sterling hattrik as city won the opening match