Ashes 2019 : स्मिथचा खेळपट्टीवर पडून भन्नाट शॉट, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

नेहमीप्रमाणे डाव सावरण्याची जबाबजारी स्टिव्ह स्मिथवर आली आणि त्याने ती चोख पारही पाडली. त्याने सामन्यात अर्धशतक पूर्ण करताना चक्क खेळपट्टीवर पडून चौकार मारला. हा शॉट पाहाल तर तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल. 

मॅंचेस्टर : ऍशेस मालिकेतील चौथ्या सोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने  नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचे दोन्ही सलामीवीर डेव्हिड वॉर्न आणि मार्कस हॅरिस स्वस्तात बाद झाले. त्यानंतर नेहमीप्रमाणे डाव सावरण्याची जबाबजारी स्टिव्ह स्मिथवर आली आणि त्याने ती चोख पारही पाडली. त्याने सामन्यात अर्धशतक पूर्ण करताना चक्क खेळपट्टीवर पडून चौकार मारला. हा शॉट पाहाल तर तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल. 

सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना तो 60 धावांवर नाबाद राहिला. त्याने मार्नस लाबुशेनसोबत 116 धावांची भागीदारी रचली. त्याने या सामन्यात चक्क खेळपट्टीवर झोपत एक शॉट मारला आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

स्मिथने बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर हा शॉट मारत चौकार खेचला आणि त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. फॉर्मात असलेल्या स्मिथने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केलीच, पण प्रेक्षकांनी मैदानात सोडलेला खेळण्यातला चेंडूही त्याने बॅटने टोलावत सीमारेषेच्या दिशेने पाठविला.

Image


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steve Smith completes his half century with a weird shot in Ashes 2019