World Cup 2019 : भारतासह 'हे' संघ असणार उपांत्यफेरीत : स्टीव्ह वॉ

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जून 2019

सध्या विश्वकरंडकाचे सामने पावसामुळे पाण्यात जात असले तरी स्पर्धेत आता चांगलीच रंगत चढली आहे. आता कोणता संघ उपांत्यफेरीत स्थान मिळविणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू स्टिव्ह वॉ यांनी आपले मत मांडले आहे. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : सध्या विश्वकरंडकाचे सामने पावसामुळे पाण्यात जात असले तरी स्पर्धेत आता चांगलीच रंगत चढली आहे. आता कोणता संघ उपांत्यफेरीत स्थान मिळविणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू स्टिव्ह वॉ यांनी आपले मत मांडले आहे. 

त्यांनी भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यासह ऑस्ट्रलियाही उपांत्यफेरीत स्थान मिळवेल अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तो म्हणाला, ''श्रीलंकेविरुद्ध मिळविलेल्या 87 धावांच्या विजयानंतर आता ऑस्ट्रेलियाचे भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यासह उपांत्यफेरीतील स्थान पक्के आहे.'' 

''प्रत्येक संघात सर्वोत्तम कामगिरी करणारा एकतरी खेळाडू असतो जो संघाला विजयापर्यंत पोहोचवतो. ऑस्ट्रेलियाच्या संघात अशी कामगिरी करणारे अनेक खेळाडू आहेत आणि हे होण्याची मी वाट पाहतो आहे. विश्वकरंडकात विजय मिळविण्यासाठी तुमच्या कर्णधाराने शब्दांनी आणि कृतीतून तुम्हाला प्रोत्साहीत करायला हवे आणि फिंच या दोन्ही आघाड्यांवर सध्या यशस्वी ठरत आहे,'' असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steve Waugh predicts his semi finalists of World Cup 2019