स्टेन, पीटरसन, मॉर्गन, अँडरसन कराराविनाच 

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - आयपीएलच्या दहाव्या मोसमाचे पडघम वाजण्यास सुरवात झाली असून, या मोसमात डेल स्टेन, केविन पीटरसन, इयॉन मॉर्गन आणि कॉरे अँडरसन असे नामांकित खेळाडू कराराविनाच राहिले आहेत. 

आठ फ्रॅंचाईजींकडून एकूण 63 खेळाडूंना मुक्त करण्यात आले असून, यात 28 परदेशी क्रिकेटपटू आहेत. बीसीसीआयने सोमवारी 44 परदेशी क्रिकेटपटूंसह एकूण 140 क्रिकेटपटूंना कायम ठेवल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. 

फ्रॅंचाईजींना याबाबत आपली खेळाडूंची यादी सादर करण्याची 16 डिसेंबर ही अखेरची मुदत होती. यामध्ये पुणे फ्रॅंचाईजीने सर्वाधिक 11 खेळाडूंना मुक्त केले आहे. पंजाबने चार, तर नवव्या मोसमात 30 लाख या आधारभूत किंमतीवर थेट 8.5 कोटी रुपये मिळालेल्या पवन नेगी याला दिल्लीने मुक्त केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रमुख खेळाडू लिलावाच्या प्रक्रियेत सहभागी होतील. 

Web Title: Steyn, Pietersen and Morgan, Anderson without the agreement