श्रीकृष्णा, फेरवानी यांच्यात अंतिम लढत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

पुणे - सबज्युनियर गटाच्या राष्ट्रीय बिलियर्डस स्पर्धेत तमिळनाडूचा एस. श्रीकृष्णा हा आपले विजेतेपद राखण्यासाठी उत्सुक असून, त्याची गाठ आता अंतिम फेरीत मुंबईच्या स्पर्श फेरवानीशी होणार आहे.  

श्रीकृष्णाने महाराष्ट्राच्या क्रीश गुरुबक्षीचा ४०६-२०३ असा पराभव केला. या लढतीत एस. श्रीकृष्णाने सुरवातीपासून सामन्यावर वर्चस्व गाजवताना ५१, ५६, ५८, आणि ६७ गुणांचे ब्रेक नोंदवले व शेवटची काही मिनिटे बाकी असताना १०७ गुणांचा ब्रेक नोंदवला.

मुंबईच्या स्पर्श फेरवानीने हरियानाच्या दिग्विजय काडियनवर २७४-१५५ असा सहज विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. 

निकाल असे ः सबज्युनिअर गट ः उपांत्य फेरी ः एस. श्रीकृष्णा (तमिळनाडू) वि. वि. क्रीश गुरबक्षी (महाराष्ट्र) ४०६-२०३, स्पर्श फेरवानी (महाराष्ट्र) वि.वि. दिग्विजय काडियन (हरियाना) २७४-१५५. उपांत्यपूर्व फेरी ः एस. श्रीकृष्णा (तमिळनाडू) वि. वि. रायन राझमी (महाराष्ट्र) ४०६ (९५, ९९) -१६७, क्रीश गुरबक्षी (महाराष्ट्र) वि. वि. के .विभास (तेलंगणा) २८९-१३३, दिग्विजय काडियन (हरियाना) वि. वि. ध्रुव चावला (पंजाब) २३५-१४०, स्पर्श फेरवानी (महाराष्ट्र) वि. वि. मेहुल सैनी (हरयाना) १९९-१११३. 

Web Title: Sub Junior National Billiards Championship Tamil Nadu S Krishna