पराभवाचे दुःख; पण स्पर्धेतील कामगिरीचे समाधान - सिंधू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

मुंबई - उपांत्य फेरीत पराजित झाल्याचे दुःख नक्कीच आहे; पण या पराभवामुळे निराश नक्कीच नाही. पदार्पणाच्या सुपर सिरीज फायनल्स स्पर्धेत उपांत्य फेरी गाठल्याचे समाधानही आहे, असे सिंधूने सांगितले. या स्पर्धेत सिंधूला खडतर उपांत्य लढतीत हार पत्करावी लागली.

सिरीज फायनल्स ही सिंधूची या वर्षातील अखेरची स्पर्धा होती. सांगता स्पर्धेत यश मिळाले नसले तरी हे वर्ष एकंदरीत चांगलेच गेले. सुपर सिरीज फायनल्स स्पर्धेस प्रथमच पात्र ठरले. या आठवड्यातही चांगली कामगिरी झाली. खडतर गट असूनही उपांत्य फेरीत प्रवेश केला. हे नक्कीच सुखावणारे आहे, असे सिंधूने सांगितले.

या स्पर्धेत सिंधूला चांगला पाठिंबा लाभला होता; मात्र त्याचेच दडपण सिंधूवर आले असावे, असे मत तिची प्रतिस्पर्धी सुंगने व्यक्त केले. ती म्हणाली, सिंधूला चांगले प्रोत्साहन लाभत होते; पण त्याचा नकारात्मक परिणामही खेळावर होऊ शकतो. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे दडपण येते. मी याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. कान बंद करीत पूर्णपणे खेळावर लक्ष केंद्रित केले. प्रेक्षकांचा पाठिंबा कोणाला कसा आहे, याचा माझ्या खेळावर काहीही परिणाम होणार नव्हता, असेही तिने सांगितल्याचे वृत्त आहे.

Web Title: Suffering defeat; But tournament performance